बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी

बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढविलेल्या शेतकऱ्यांच्या जवळपास चार हजारांवर तक्रारी बीड जिल्हा कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी अडीच हजारांवर तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
 Direct inspection of over two and a half thousand seed complaints by the Department of Agriculture
Direct inspection of over two and a half thousand seed complaints by the Department of Agriculture

बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढविलेल्या शेतकऱ्यांच्या जवळपास चार हजारांवर तक्रारी बीड जिल्हा कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी अडीच हजारांवर तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या बीड जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरलेले बियाणे न उगविल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील ११ तालुक्यातून जवळपास ४ हजार ३२९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पेरलेले बियाणे न उगवल्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या. त्यांपैकी २ जूलै अखेरपर्यंत २७८५ शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त तक्रारीनुसार, बीड तालुक्यातील ४६०, पाटोदा २९९, आष्टी ४, शिरूर ७८, माजलगाव १३०, गेवराई ४, धारूर २८४, वडवणी १६५, अंबाजोगाई २७४, केज १३४७, तर परळी तालुक्यातील १२८४ तक्रारींचा समावेश आहे. तक्रारीच्या बाबतीत केज तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यापाठोपाठ परळी, बीड,  पाटोदा, धारूर, अंबाजोगाई, माजलगाव आदी तालुक्यांचा क्रम आहे. 

तालुकानिहाय प्रत्यक्ष पाहणी केलेल्या तक्रारीनुसार बीड तालुक्यातील २१५, पाटोदा ९४, आष्टी ४, शिरूर कासार ४४, माजलगाव २६, धारूर १३, वडवणी १३, अंबाजोगाई ४२२, केज ८२५, तर परळी तालुक्यातील ९६९ तक्रारींची समितीतर्फे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com