आंबा महोत्सवात हापूस, केसरची थेट विक्री

आंबा महोत्सवात हापूस, केसरची थेट विक्री
आंबा महोत्सवात हापूस, केसरची थेट विक्री

औरंगाबाद : शहरातील जाधववाडी बाजार समितीमध्ये आंबा महोत्सवास आजपासून (ता.१३) सुरूवात झाली. बाजार समिती व पणन मंडळातर्फे आयोजित हा महोत्सव १७ मेपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात कोकणचा राजा हापूस व मराठवाड्याचा चवदार केसरची खरेदी थेट उत्पादक शेतकऱ्यांकडूनच करण्याची संधी ग्राहकांना प्राप्त झाली आहे.

विभागीय सहनिबंधक सतिष क्षिरसागर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, सभापती राधाकिसन पठाडे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक जी. सी. वाघ, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ उपस्थित होते.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे यांनी महोत्सावाला भेट देवून स्टॉलधारक आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.राज्य कृषी पणन मंडळाच्या थेट विक्री योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी या महोत्सवाद्वारे मिळाली आहे. बाजार समितीच्या आवारातील फूल मार्केटच्या गाळ्यांमध्ये हा महोत्सव सुरू आहे.

या महोत्सवात हापूस व केसरचे मिळून जवळपास २१ आंबा उत्पादक सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी जवळपास १५०० पेटी हापूस, तर केसर व वनराज मिळून ७०० ते ८०० किलो आंबे विक्रीसाठी आले. १७ शेतकरी हापूस उत्पादक, तर ३ शेतकरी केसर व वनराज उत्पादक आहेत.

हापूस २०० रूपये डझनपासून, केसर १२० रूपये प्रतिकिलोने विक्रीसाठी उपलब्ध आहे. चारपासून सहा डझनपर्यंत हापूस आंब्याच्या पेट्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत. सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान आंब्याची विक्री सुरू राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com