Agriculture news in Marathi Direct purchase and sale of vegetables was strengthened | Agrowon

भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था झाली बळकट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात बाजार समितीशिवाय थेट खरेदी विक्री होत असल्याने खरेदीदारांनी बाजार समितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासूनच्या बंद नंतर, तीन दिवसांपासून बाजार सुरू झाल्यानंतरही शेतकरी आणि खरेदीदारांनी समितीकडे पाठ फिरविल्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक चित्र दिसत आहे.

पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात बाजार समितीशिवाय थेट खरेदी विक्री होत असल्याने खरेदीदारांनी बाजार समितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासूनच्या बंद नंतर, तीन दिवसांपासून बाजार सुरू झाल्यानंतरही शेतकरी आणि खरेदीदारांनी समितीकडे पाठ फिरविल्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक चित्र दिसत आहे.

शेतमाल खरेदी विक्रीच्या बाजार समिती आणि आडतदारांच्या एकाधिकारशाही मुळे संघटीत शक्ती कोरोना विषाणूने संपुष्टात आणल्याची चित्र सध्या दिसत आहे. वर्षानुवर्षे बाजार समित्यांमधील एकाधिकारशाहीला पायबंद घालण्यासाठी महायुतीच्या सरकारने बाजार समितीमधून फळे आणि भाजीपाला नियनममुक्त केले. मात्र नियमनमुक्तीचा प्रभावी लाभ शेतकऱ्यांना न घेता आल्यामुळे बाजार समित्याचे अस्तित्व अबाधित राहिले. मात्र, कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांना स्वतःची वितरण व्यवस्था उभारण्यात काही अंशी यश आले. ही व्यवस्था अधिक सुरळीत आणि बळकट करण्याचे शेतकरी आणि शासनापुढे आव्हान आहे.

टाळेबंदीमध्ये शहरे आणि उपनगरांमध्ये शेतकरी आणि खरेदीदार असा थेट व्यवहार विविध ठिकाणी सुरू आहे. या व्यवहारांमध्ये हमाली, तोलाई, आडत, इतर खर्चच नसल्याने हे शेतकरी आणि खरेदीदारांना सोयीचे झाले. यामुळे शहरात अनेक ठिकाणी ही व्यवस्था सुरळीत सुरू असल्याने बाजार समिती सुरू करुन देखील शेतमालाची आवक व खरेदीदार होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आडतदार हवालदिल झाले असून, शहरांमधील व बाजार समिती आवारालगत सुरू असलेली थेट खरेदी विक्री बंद करण्याची मागणी आता आडतदार आणि हमाल संघटनांकडून होऊ लागली आहे.

पुणे बाजार समितीमध्ये होतेय तुरळक आवक
गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर गेली सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे भाजीपाला कांदा बटाटा विभाग तीन दिवसांपासून सुरू करण्यात आला आहे. मात्र, आवक आणि खरेदीदार नियंत्रित असल्याने शेतमालाला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. २) मुख्य आवारात २३२ वाहनांमधुन सुमारे ८ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. हिच आवक सर्वसाधारण (कोरोना टाळेबंदी नसताना) सुमारे दोन हजार वाहनांची होत होती. ही आवक आता दोन महिन्यांनंतर बाजार समिती सुरू करुन सुद्धा २५० वाहनांपेक्षा जास्त वाढताना दिसत नाही.

आवार आवक (वाहने) क्विंटल
मुख्य आवार २३२ ८ हजार २००
मोशी उपबाजार १५१ २ हजार २५०
मोशी उपबाजार १५१ २ हजार २५०
उत्तमनगर १४ ७०
एकूण ५१७ ११ हजार १८०

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...