नाशिकमध्ये शेतकरी कंपनीतर्फे कांद्याची थेट खरेदी, अन् विक्रीही

सध्या कांद्याला ७ ते ९ रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहे. फाईव्हस्टार शेतकरी कंपनीने १४ रुपये किलो प्रमाणे १ किलो पॅकिंग साईजमध्ये परिसरातून कांदा खरेदी केला. बांधावर शेतमाल विक्रीची सुविधा होऊन दर चांगले मिळाले. - बापु बोरसे, कांदा उत्पादक शेतकरी 'शेतकरी ते ग्राहक' ही एक व्यवस्था ग्रामीण भागात सुरू ठेवली आहे. कंपनीच्या एक छोटया प्रयत्नातून देखिल शेतकरी वर्गाला दिलासा मिळत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा साखळी उभी करण्यात यश आले आहे. - अनिल शिवले,अध्यक्ष, फाईव्ह स्टार शेतकरी उत्पादक कंपनी
 Direct purchase, sale of onion by farmer company in Nashik
Direct purchase, sale of onion by farmer company in Nashik

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांचे कधी सुरू, तर कधी बंद असलेल्या कामकाजामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत देवळा तालुक्यातील सावकी येथील फाईव्ह स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर कांदा खरेदी केली. तसेच विक्रीची व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारापेक्षा दोन रुपये जागेवरच जास्त मिळत आहेत. कंपनीने अधिक दर देण्यासह जागेवर खरेदी व्यवस्था व विपणन साखळी उभी केल्याने शेतकऱ्यांनी त्यास पसंदी दिली आहे. 

कंपनीद्वारे तालुक्यातील सावकी, खामखेडा, धराणा या गावांमधून आत्तापर्यंत ३०० टन कांद्याची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच हाताळणी, प्रतवारी करून १,२० व ५० किलो वजनाचे पॅकिंग केले जाते. या कामी लागणाऱ्या गोण्या, साहित्य व वाहतूक व्यवस्था कंपनीकडून शेतकऱ्यांना पुरविण्यात आली आहे. मालाचा चेन्नई, मुंबई येथील व्यापारी, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला पुरवठा केला जात आहे. 

व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल शिवले, उपाध्यक्ष प्रकाश पाटील,संचालक दिलीप पाटील, गणेश टिपले, भाऊसाहेब पवार, किरण निकम, निलेश पाटील, सारिका शिवले करत आहेत. तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांचे मार्गदर्शन व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे यांच्या समन्वयातून शेतकरी कंपनीला सहाय्य मिळत आहे.    असे आहे कामकाज... 

  •  शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी 
  • मागणीनुसार कांद्याची विशिष्ठ वजनामध्ये पॅकिंग 
  • त्यासाठी आवश्यक साहित्याचा कंपनीकडून पुरवठा 
  • कंपनीकडून वाहतूक व्यवस्था 
  • थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पैसे 
  • कांदा गोणीचा आकार : प्रतिकिलो दर 

    १ किलो १२ रुपये 
    २० किलो ११ रुपये
    ५० किलो १०.५०रुपये

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com