सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री रखडली

सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने प्रयत्न केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी गट आणि कंपन्या थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी पुढे आले.
 Direct sale of farm produce stalled due to lack of planning in Sangli
Direct sale of farm produce stalled due to lack of planning in Sangli

सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने प्रयत्न केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी गट आणि कंपन्या थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी पुढे आले. शेतीमाल, भाजीपाला, फळे विक्री केली. त्यामुळे थेट शेतीमाल विक्रीची साखळी अधिक मजबूत होण्याला मदत होण्याची आशा होती. मात्र, शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीची चाके कृषी विभागाच्या नियोजनाअभावी रुतली असल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊनध्ये बाजार समित्या, आठवडी बाजार व शहरातील मोठ्या मंडईही बंद कराव्या लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना फळे, भाजीपाला विकता यावा, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले. बाजार समिती परिसरात लिलाव बंद असले तरी फळे, भाजीपाल्याचे बाजार सुरू होते. तेथे शेतकरी ग्राहक, छोट्या विक्रेत्यांना थेट विक्री करत होते. याशिवाय शेतकरी गट, शेतकरी कंपन्या थेट सोसायट्यांमध्ये विक्री करत होत्या. जिल्ह्यात सुमारे दररोज ९४ शेतकरी गट आणि कंपन्यांद्वारे १४ हजार ४४० टन शेतीमालाची विक्री होत आहे.

‘आत्मा’द्वारे स्थापन केलेले शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांद्वारे शेतीमाल विक्री करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार शेतकरी कंपन्या आणि गट स्थापन केले. जिल्ह्यात सुमारे २०० हून अधिक शेतकरी गट आणि कंपन्या आहेत. हे गट थेट शेतीमाल विक्रीसाठी पुढे आले. पण, त्यासाठीचा प्रयत्न कमी पडल्याचे दिसते आहे. दोन महिन्यापासून वाहतूक सुरु झाली, बाजार समितीमध्ये सौदे सुरु झाले. त्यामुळे आपोआप शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना बंद  होऊ लागली आहे. 

कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

दरम्यान, कृषी विभागाकडून माहिती घेणे बंद झाले. शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीची साखळी अधिक भक्कम होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. ही साखळी सक्षम झाली तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळेल, ग्राहकांनाही त्याचा फायदा होईल. त्यासाठी निधी उपलब्ध नाही. शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी जागेचा अभाव आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू नसल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com