दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
अॅग्रो विशेष
पाहिजे तो भाजीपाला थेट दारात; नाशिकमध्ये 'स्वाभिमानी'चा उपक्रम
आज कोरोनामुळे भाजीपाला उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. मात्र शहरातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये,तसेच वाहतूक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल पडू नये यासाठी नियोजनपूर्वक कामकाज सुरू आहे.
- प्रा.संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
नाशिक : कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या परिस्थितीत शहरातील ग्राहकांना रास्त दरात भाजीपाला मिळावा व शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या शेतमालाची विक्री व्हावी या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरात उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर भाजीपाला विक्रीला सुरुवात केली आहे.
सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थिती शहर वासियांना ताजा भाजीपाला,फळे मिळावे व शेतकऱ्यांनाही शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा. यासाठी नाशिक शहरात 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर शेतकऱ्यांच्या शेतातून थेट भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये द्राक्षे, कांदा, कांदापात, सिमला मिरची, भोपळा, वांगी, टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला उपलब्ध करून दिल्या जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात तरुण शेतकरी सहभागी झाले असून आपल्याकडील स्वतःचा तसेच इतर शेतकऱ्यांचा काढणीस आलेला शेतमाल घेऊन विक्रीसाठी आणला जात आहे. भाजीपाला ऑर्डर घेताना सामूहिक सोसायटीला प्राधान्य दिले जात आहे. भाजीपाला देण्यापेक्षा मोबाईल वरून ऑर्डर घेतली जाते व जमावबंदीचे नियम पाळून हा माल विक्री केला जात आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना रास्त दरात तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला दोन पैसे मिळत आहेत.
प्रतिक्रिया..
आज कोरोनामुळे भाजीपाला उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. मात्र शहरातील ग्राहकांची गैरसोय होऊ नये,तसेच वाहतूक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल पडू नये यासाठी नियोजनपूर्वक कामकाज सुरू आहे.ही विक्री साखळी नाशिक च्या बाबतीत मर्यादित न राहता राज्यभर,देशभर जावी. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे व ग्राहकांना ताजा भाजीपाला माफक दरात उपलब्ध करून देण्यात हे प्रयत्न सुरू राहतील.
- प्रा.संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
- 1 of 657
- ››