agriculture news in Marathi direct vegetable and fruits sell down Maharashtra | Agrowon

राज्यात थेट भाजीपाला, फळे विक्रीत घट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

राज्यातील काही बाजार समित्या बंद केल्या होत्या. त्या ‘अॅग्रोवन’च्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरु होत आहेत, हा शेतकरी, भाजीपाला उत्पादकांना दिलासा आहे. शेतकऱ्यांना मोठ्या बाजार समिती तसेच थेट विक्रीतील अडचणी दूर व्हाव्यात. 
- संतोष भापकर, अध्यक्ष, संपुर्ण शेतकरी गट, गुंडेगाव ता. नगर, जि. नगर

नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (ता.११) राज्यातील प्रमुख बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे राज्यात दररोज होणाऱ्या फळे, भाजीपाल्याच्या विक्रीत सुमारे एक हजार टनांची घट झाल्याचे गेल्या चार दिवसात स्पष्ट झाले. ‘अॅग्रोवन’च्या पुढाकारामुळे प्रमुख बाजार समित्यांत भाजीपाला, फळांची खरेदी- विक्री सुरु होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, बंदच्या काळात गेल्या पंधरा दिवसात शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून सुमारे बत्तीस हजार टन भाजीपाला, फळांची विक्री झाली. 

कोरोना संसर्गामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय झाला. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता भाजीपाला बाजार बंद केल्याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे कृषी विभागाच्या आढाव्यात स्पष्ट झाले. गेल्या पंधरा दिवसात दर दिवसाला पावने दोन हजार ते अडीच हजार टन भाजीपाला, फळांची विक्री होत होती. मात्र चार दिवसांत बाजार समित्या बंद असल्याच्या काळात भाजीपाला, फळांची विक्री एक हजार टनाच्या आता आल्याचे स्पष्ट झाले. 

आजपासून मुंबईसह अन्य काही बाजार समित्या सुरु होणार असल्याने पुन्हा फळे, भाजीपाल्याची विक्री सुरळीत होण्याची आशा आहे. 

पंधरा दिवसातील फळे, भाजीपाल्याची विभागनिहाय विक्री (क्विंटलमध्ये)
ठाणे ः १९,४३५, कोल्हापुर ः ५८,२३६, नाशिक ः ३७,९००, पुणे ः ७३,२००, औरंगाबाद ः ८,६७५, लातूर ः २४,६४०, अमरावती ः ७१,५००, नागपूर ः २७,५७५

 

 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...