महाविद्यालयीन शिबिरांच्या माध्यमातून विचारांची दिशा

महाविद्यालयीन शिबिरांच्या माध्यमातून विचारांची दिशा
महाविद्यालयीन शिबिरांच्या माध्यमातून विचारांची दिशा

जालना : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना स्वतःमधील गुण विकसित करण्याचा, तसेच तडजोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सोबतच बदलत्या काळानुसार शिक्षणात कृषी कौशल्ये आत्मसात करण्याचा सल्ला कार्ला येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत लहाने यांनी दिला. 

कृषी महाविद्यालय खरपुडीचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर कचरेवाडी येथे बुधवारी (ता. ३०) सुरू झाले, त्याचे उद्‌घाटक म्हणून श्री. लहाने बोलत होते. 

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश कोहिरे, कचरेवाडीचे सरपंच गणेशराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य सखाराम पवार, डॉ. अरविंद महाजन, उप-प्राचार्य डॉ. विकास देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपक क्षीरसागर, प्रा. सुनील कळम, प्रा. सचिन पाळणे, तुषार देठे, गावकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश कोहिरे, उपप्राचार्य डॉ. विकास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश कोहिरे यांनी रासेयो शिबिराचे उद्देश व महत्त्व समजावून सांगितले. रासेयोअंतर्गत ग्रामीण भागात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य लाभेल, असे गावचे सरपंच गणेश जाधव यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी घोडके, तर सूत्रसंचालन परीक्षित भोसले यांनी केले. प्रा. दीपक क्षीरसागर यांनी आभार मानले. या शिबिरासाठी प्रा. सुनील कळम, प्रा. सचिन पाळणे, तुषार देठे, अक्षया कदम आदींनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com