agriculture news in Marathi directions not given for food grain procurement Maharashtra | Agrowon

धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य खरेदी सुरू करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे. परंतु ऑनलाईन नोंदणी सुरू केव्हा करणार, याबाबत केंद्रधारक अनभिज्ञ आहेत.

जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य खरेदी सुरू करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे. परंतु ऑनलाईन नोंदणी सुरू केव्हा करणार, याबाबत केंद्रधारक अनभिज्ञ आहेत. खरेदी सुरू करण्यास फारसे दिवस राहीलेले नाहीत. अशातच केंद्रधारकांमध्ये नोंदणीबाबत संभ्रम असल्याने प्रशासनाकडून नवे आदेश जारी करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यात १९ खरेदी केंद्रांमध्ये ज्वारी, बाजरी व मक्याची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची माहिती प्रशासनाने बुधवारी (ता.२१) जारी केली. खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ही नोंदणी निश्‍चित खरेदी केंद्रात करावी लागते. परंतु नोंदणी केव्हा सुरू होईल, याची माहिती केंद्रधारकांकडे नाही. ज्वारी, मक्याची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. शेतकरी धान्य विक्री करीत आहेत. 

जिल्ह्यात हमीभाव कुठल्याही भरड धान्याला मिळत नसल्याची स्थिती आहे. ज्वारीची ११००, मक्याच ११०० ते १३०० आणि बाजरीचीदेखील १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या घोषणेनंतर काही शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील केंद्रांमध्ये नोंदणीसाठी संपर्क साधला, परंतु नोंदणी करून घेण्यात येत नसल्याची माहिती मिळाली. कारण नोंदणी सुरू करा, असे कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाने केंद्रांना दिलेले नाहीत. 

अर्ज स्वीकारण्याची मागणी 
लेखी आदेश मिळतील, गोदामे उपलब्ध आहेत का? याची शाश्‍वती होईल, तेव्हाच खरेदीसाठी नोंदणी केली जाईल, असे एका केंद्रधारक संस्थेतील अधिकाऱ्याने सांगितले. शेतकरी नोंदणीसाठी शहरात किंवा भाडे खर्च करून येत आहेत. त्यांचे अर्ज स्वीकारले जावेत. नोंदणीच्या आदेशांचा मुद्दा उपस्थित करून त्यांना परत पाठवू नये, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...