Agriculture news in Marathi Directorate of Agricultural Processes to be set up: Agriculture Minister Bhuse | Page 4 ||| Agrowon

कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार ः कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 जून 2021

कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मूल्यसाखळीच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले.

मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मूल्यसाखळीच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. कृषी हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी प्रक्रिया, कृषी मूल्यसाखळी बळकटीकरण व कृषिमालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषी परिवर्तन प्रकल्प, पंतप्रधान अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, गट शेती योजना यांसारख्या योजना राबविल्या जात आहेत. या योजना समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे श्री. भुसे यांनी सांगितले.  

अस्तित्वात असलेल्या कृषी प्रक्रिया सुविधांचे मॅपिंग करून त्यात भर टाकण्यासाठी व उणिवा दूर करण्यासाठी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमांतून अर्थसाह्य उपलब्ध करून द्यावे. कृषी प्रक्रिया उद्योगाबाबत कौशल्य असलेल्या तज्ज्ञांच्या सेवेचा वापर करून मूल्यसाखळी विकसित करताना समन्वय ठेवावा, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले. कृषिमालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादननिहाय मानके निश्‍चित करावी. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात शहरीकरण झाले असल्याचे लक्षात घेऊन या भागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी व याकरिता विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी. उद्योग महामंडळ व कृषी विद्यापीठे यांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देऊन प्रयत्न करावेत, असे भुसे यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत...
वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा ः...दापोली, जि. रत्नागिरी ः शेती करणे हे जगातील...
पीकविमाप्रश्‍नी चूल बंद आंदोलनाला...निफाड, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात दोन...
‘कादवा’ करणार सीएनजी निर्मिती ः अध्यक्ष...नाशिक : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण...
मेघोली तलाव फुटून शेतीचे नुकसानकोल्हापूर ः मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव...
नगर, शेवगाव, पाथर्डीत पावसाने नुकसाननगर ः शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन...
खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन गेट उघडले बुलडाणा ः मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा फायदा...
पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर कारवाईजळगाव ः जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी...
डॉ. आढाव, रावल यांना आबासाहेब वीर...सातारा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव...
मराठवाड्यात ६७ मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद : कायम लहरीपणाचा परिचय देणारा पाऊस...
कपाशी, मिरची पिकांत वाढली ‘मर’औरंगाबाद : पावसाची उघडीप मिळाली असताना आता...
सरकारकडून तिसऱ्या लाटेचा बाऊ ः...नागपूर : राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी...
यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?अकोला ः गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा...
चालते-बोलते विद्यापीठ काळाच्या पडद्याआडपुणे : डॉ. ज्ञानदेव हापसे हे ऊस विज्ञानाचे चालते-...
रब्बी पीक प्रात्यक्षिक अर्जाला आजपासून...हिंगोली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य...
निकृष्ट साहित्य मारले शेतकऱ्यांच्या माथीनागपूर ः गैरप्रकारांना चाप बसावा याकरिता थेट...
सोलापूर : भाजीपाल्यांचे दर दबावाखालीसोलापूर : आधीच पावसाने प्रदीर्घ विश्रांती...
कोल्हापुरात भाज्यांचे दर आठवड्यात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या सप्तहापासून...
सिमला मिरची पाच, टोमॅटो चार रुपये किलोनगर : नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यांत टोमॅटोला...
सांगली : उत्पादन खर्च वाढला,...सांगली : आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार...