आमदार सोपल यांच्यासह संचालकांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

आमदार सोपल यांच्यासह संचालकांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
आमदार सोपल यांच्यासह संचालकांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणात ठपका असलेले तत्कालीन संचालक, आमदार दिलीप सोपल यांच्यासह तत्कालीन सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला. 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५-१६ या आर्थिक वर्षातील वैधानिक लेखापरीक्षणानुसार १ कोटी ५ लाख रुपयांच्या अपहाराप्रकरणी ठपका ठेवून जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून तत्कालीन सभापती, आमदार सोपल यांच्यासह संचालक, रोजंदारी कर्मचारी आदी १२५ जणांविरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी ही सुनावणी झाली.

फिर्याद दाखल झाल्यानंतर सोपल, सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी एक वर्षापूर्वी अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकार पक्षातर्फे २० जानेवारी २०१८ रोजी म्हणणे दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात सर्व संशयित आरोपींनी गुन्हा रद्द ठरविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने, या गुन्ह्याचा तपास करावा. मात्र सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करू नये, असे आदेश पोलिसांना दिले. पण आता सत्र न्यायालयाने हा आदेश दिल्याने या प्रकरणाच्या कारवाईकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. 

असे आहे प्रकरण शीतगृह भाडेकरारातील १३ लाख ८० हजार रुपये, गाळेधारक व्यापारी अतिक्रमण भाड्याचे २५ लाख ३६ हजार, नियमबाह्य, हंगामी १०३ कर्मचारी भरतीचे प्रकरणातील ४७ लाख ४१ हजार रुपये, हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सुटीच्या दिवसांतील १८ लाख ४३ हजाराचे बनावट वेतन वाटप केले. असे १ कोटी ५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका या प्रकरणातील तत्कालीन संचालकांवर आहे. न्यायालयाच्या निकालाने आता सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com