agriculture news in Marathi, directors witch involved in fraud trying for bail, Maharashtra | Agrowon

फसवणूक प्रकरणातील संचालकांची जामिनासाठी पळापळ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

वाशीम : येथील खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत गेल्या हंगामात शेतकऱ्यांचा शेतमाल ऑनलाइन नोंदणी पद्धतीने खरेदी करणे गरजेचे असताना तो ऑफलाइन खरेदी करून शेतकरी व शासनाची फसवणूक; तसेच एक कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांच्या शेतमालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली अाहे. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून संबंधितांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सोमवारी (ता.२४) सुनावणी होण्याची शक्यता अाहे. 

वाशीम : येथील खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत गेल्या हंगामात शेतकऱ्यांचा शेतमाल ऑनलाइन नोंदणी पद्धतीने खरेदी करणे गरजेचे असताना तो ऑफलाइन खरेदी करून शेतकरी व शासनाची फसवणूक; तसेच एक कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांच्या शेतमालाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली अाहे. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून संबंधितांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर सोमवारी (ता.२४) सुनावणी होण्याची शक्यता अाहे. 

वाशीम खरेदी-विक्री संस्थेत घडलेल्या या प्रकरणात १५ संचालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले अाहेत. मुळात हा प्रकार समोर येऊन बरेच दिवस झाले होते. मात्र, यासंदर्भात वेगाने कार्यवाही केल्या गेली नव्हती. वाशीम खरेदी-विक्री संस्थेला शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी एजन्सी म्हणून मान्यता दिली होती. शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करून तो माल नाफेडसाठी खरेदी करण्याची जबाबदारी असताना शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्यात अाली. ऑफलाइन पद्धतीने माल खरेदी केला. या खरेदी केलेल्या मालापैकी ४८८ क्विंटल तूर, अाणि दोन हजार ५०९ क्विंटल हरभरा अकोला येथे विकल्याची चर्चा अाहे.
 
प्रशासकीय स्तरावरून या प्रकरणात कोणतीही हालचाल झाली नव्हती. या प्रकरणात सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांनी वाशीम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात अाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधितांकडून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात अाला. न्यायालय यामध्ये सोमवारी अादेश देण्याची शक्यता अाहे. न्यायालयाचा अादेश नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून अाहे.

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...