बुलडाणा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

बुलडाणा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
बुलडाणा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

बुलडाणा  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. संशयित रुग्णांमुळे आपत्तिनक परिस्थिती जिल्ह्यात उद्‍भवू नये यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाबाबत सामाजिक माध्यमांमधून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी माहिती द्यावी. आरोग्य विभागाने कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करावी. जनजागृतीपर साहित्य प्रकाशित करून वितरित करावे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र ॲब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्‍क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविण्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. कोरोनाचा विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच लग्न, धार्मिक कार्यक्रम यामध्ये सुद्धा गर्दी कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी स्वत:हून धार्मिक कार्य, लग्न समारंभ टाळावेत याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापकांना सूचना देण्यात येत आहेत, अशी माहिती या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये ही होऊ शकते कारवाई  आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील २००५ कलम ३४ नुसार जर एखाद्या व्यक्तीमुळे एखादी कुठली आपत्ती ओढवणार आहे, असे लक्षात आले, तर अशा व्यक्तीच्या हालचालींवर प्रतिबंध करता येतो. या कायद्याच्या अनुषंगाने आदेश काढले असल्यास व त्याचे पालन न केल्यास एका वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. अफवांवर विश्‍वास ठेवू नये जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात अर्धवट माहिती असलेले, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, असे कोणतेही संदेश कुणीही अधिकृत स्रोतांकडून खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाइनला फोन करून शंका निरसन करावे. चुकीचे मेसेज पाठवू नयेत. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश प्राप्त झालेले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com