बोरी धरणाच्या दोन दरवाज्यांतून ९०३ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

पारोळा, जि. जळगाव ः बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरण ८३ टक्के भरले. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. २८) अडीचच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ९०३ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.
Discharge of 903 cusecs of water through two gates of Bori Dam
Discharge of 903 cusecs of water through two gates of Bori Dam

पारोळा, जि. जळगाव ः बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरण ८३ टक्के भरले. त्यामुळे धरणातून रविवारी (ता. २८) अडीचच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे ०.१५ मीटरने उघडून ९०३ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.

काही दिवसांपूर्वी विंचूरसह आर्वी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाची पातळी एक मीटरने वाढली होती; परंतु क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी २६६.५० मी. वाढल्याने धरण ८३ टक्के भरले. यामुळे धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने तहसीलदार अनिल गवांदे यांनी धरणस्थळी जाऊन धरणाच्या स्थितीची माहिती अधिकारी वर्गाकडून जाणून घेतली. दरम्यान, बोरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिंचनाचा प्रश्न सुटणार बोरी धरणातून विसर्ग करण्यात आलेले पाणी हे नदीपात्राद्वारे सोडण्यात येते. त्यामुळे नदीकाठावरील तामसवाडी, तरडी, टोळी, मोंढाळे प्रऊ, उंदीरखेडा, विचखेडे, बहादरपूर, भिलाली या परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल. बऱ्याच ठिकाणी शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा अभियानातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याने विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com