Agriculture news in marathi Discharge to first patient of 'corona in Nashik district | Agrowon

नाशिकमधील पहिल्या ‘कोरोना’बाधित रुग्णाला डिस्चार्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि सुजाण नाशिककर आपली जबाबदारी पार पाडत आहेत. या लढ्यात आरोग्य विभागाचे योगदान अतुलनीय आहे. हा लढा लवकर जिंकायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी‘लॉकडाऊन’च्या नियमांचे उल्लंघन करू नये. 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 

नाशिक : लासलगावमधील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला ११ दिवसांच्या नियोजनबद्ध उपचारानंतर मंगळवारी(ता.१४) जिल्हा रूग्णालयातून सशक्त रूग्ण म्हणून घरी सोडण्यात आले. या रूग्णास रूग्णालयातर्फे दीर्घ आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

निफाड तालुक्यामधील लासलगाव येथील हा रुग्ण खोकला व ताप अशी न्युमोनिया सदृश लक्षणे असल्याने २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्त्रावाची चाचणी केल्यानंतर २९ मार्चला अहवाल पॉझिटीव्ह आला. हा जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, वॉर्ड बॉय यांच्या मदतीने रूग्णाला औषोधोपचारांसोबत मानसिक आधार देखील दिला गेला. त्यामुळे ‘कोरोना’विरूध्दचे युध्द हा रुग्ण जिंकू शकला. 

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रुग्णाशी संवाद साधला. या रुग्णाने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांचे आभार मानले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास महिनाभर घरी राहण्याचा सल्ला दिला. आरोग्यविषयी समस्या वाटत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याची सूचना केली. या रुग्णाचे समाजात 'कोरोना वॉरियर' म्हणून स्वागत केले जाईल. इतर संशयितांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, जेणेकरुन कोरोना विषाणूचाचा फैलाव होणार नाही, असेही मांढरे यांनी सांगितले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार, डॉ. प्रमोद गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, डॉ. एस. आर. राठोड. डॉ. आवेश पडोल, डॉ. गणेश चवले उपस्थित होते. 

 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...