Agriculture news in Marathi Discharge of water from Hatnur dam started | Page 2 ||| Agrowon

हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे बुधवारी (ता. ८) पूर्ण उघडण्यात आले. धरणातून ८२ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याचा साठा वाढल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे बुधवारी (ता. ८) पूर्ण उघडण्यात आले. धरणातून ८२ हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुरुवारी सकाळी (ता. ९) धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू होता.

तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रात मंगळवारी (ता. ७) सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे हतनूर धरण पूर्ण भरल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास तापी नदीपात्रात ८२ हजार २७८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. काही तासांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या लगतच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रात कुणीही गुरेढोरे सोडू नये, कोणीही नदीपात्रात जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 पूर्णा नदीतून पाण्याचा विसर्ग सोडणार 
पूर्णा नदीतून सुमारे चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी सायंकाळी सात ते रात्री नऊच्या दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हतनूर धरणाखाली नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...