विष्णुपुरी प्रकल्पातून साडेसोळा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

नांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून सोळा हजार ६३२ क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
Discharge of water from Vishnupuri project by sixteen and a half thousand cusecs
Discharge of water from Vishnupuri project by sixteen and a half thousand cusecs

नांदेड  : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून सोळा हजार ६३२ क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी झालेला पाऊस तसेच येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्पातून पाण्याचा येवा सुरू असल्याने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे पूर नियंत्रण अधिकारी सी. एस. गाळगेस्वामी यांनी दिली.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण जलाशयात यंदा जुलैमध्ये पाण्याचा येवा सुरू झाला. तारीख १० जुलै रोजी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ११ जुलै रोजी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून अतिरिक्त पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.

यानंतर पावसाचे चांगले प्रमाण तसेच पूर्णा नदीवर असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णा नदीच्या माध्यमातून विष्णुपुरी प्रकल्पात येत आहे. यामुळे प्रकल्पातून आतापर्यंत अनेक वेळा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले.

 आजपर्यंत ६२६ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याची माहिती गाळगेस्वामी यांनी दिली. दरम्यान, रविवारी विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. तसेच येलदरी व सिद्धेश्वर धरणाची पाणी विष्णुपुरी प्रकल्पात आल्यामुळे सोमवारी प्रकल्पाचा १३ क्रमांकाचा दरवाजा उघडून गोदावरी नदीत १६ हजार ६३२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com