निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्ग

परभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे.
Discharged 7190 cusecs from nimna Dudhana
Discharged 7190 cusecs from nimna Dudhana

परभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी (ता.२०) सकाळी या धरणात ९४.५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. रविवारी सकाळी या धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. नदी पात्रात ७१९० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षीच्या (२०१९) पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाला. त्यामुळे निम्म दुधना धरणात जेमतेम १० ते ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे हे धरण भरत आले आहे.

या धरणातील एकूण पाणीसाठा ३३१.६८२ दलघमी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा २२९.०८२ दलघमी (९४.५८ टक्के) आहे. आजवरच्या पावसाळ्यात या धरणात एकूण २५८.०६९ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. वरच्या भागातून धरणात ११ हजार १८३ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे. 

धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात ९४ टक्के पेक्षा अधिक वाढ झाली. त्यामुळे रविवारी सकाळी या धरणाचे चार दरवाजे उघडून नदीपात्रात ७ हजार १९० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com