‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून बांबूच्या नव्या प्रजातीचा शोध

‘स्टुडोक्सिटेननथ्रा’ कुळातील नव्या प्रजातीचे संशोधन वरिष्ठशास्त्रज्ञ डॉ. पी. तेताली यांच्या प्रयत्नांतून समोर आले आहे. त्यामुळे ‘मेस’ या बांबू प्रजातीचे नामकरण आता ‘स्टुडोक्सिटेननथ्रा माधवी’ असे करण्यात आले आहे.
Discovery of a new species of bamboo from the Sahyadri range
Discovery of a new species of bamboo from the Sahyadri range

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट परिसरात बांबू लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथील ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली आहे. येथे आढळणाऱ्या बांबू प्रजातींमध्ये विविधता असून ‘मेस’ आणि ‘मणगा’ या दोन प्रजातींना वनस्पतिशास्त्रानुसार ‘स्टुडोक्सिटेननथेरा स्टाॅक्सि’ या नावानेच ओळखले जात होते. यामधील ‘स्टुडोक्सिटेननथ्रा’ कुळातील नव्या प्रजातीचे संशोधन वरिष्ठशास्त्रज्ञ डॉ. पी. तेताली यांच्या प्रयत्नांतून समोर आले आहे. त्यामुळे ‘मेस’ या बांबू प्रजातीचे नामकरण आता ‘स्टुडोक्सिटेननथ्रा माधवी’ असे करण्यात आले आहे.

बांबूला व्यावसायिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून शेतकरी, आदिवासी बांधव व कारागिरांचा मोठा रोजगार अवलंबून असतो. महाराष्ट्रात साधारण बांबूच्या १० प्रजाती असून, सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्‍चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडी आढळून येतात. संशोधनातून ‘मेस’ आणि ‘मणगा’ या दोन्ही प्रजाती वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळ्या असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. पी. तेताली यांना आघारकर संशोधन संस्था पुणे येथील अनुवंशिकी व वनस्पती पैदास विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. सुजाता तेताली, वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ मंदार दातार, आण्विक जीवशास्त्रज्ञ रितेशकुमार चौधरी, संशोधक विद्यार्थी सारंग बोकील यासह केरळ वन संशोधन संस्थेचे संशोधक डॉ. ई. एम. मुरलीधरन यांचे संशोधनात सहकार्य लाभले आहे.

डाॅ. तेताली यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ‘मेस’ आणि ‘मणगा’ या प्रजातींची निरीक्षणे नोंदविली. बांबूच्या फुलांचा हंगाम हा दुर्मीळ मानला जातो. पानशेत जवळील शिरकोली येथे ‘मेस’ आणि ‘मणगा’ या दोन्ही प्रजातींवर आलेला फुलोऱ्याचे निरीक्षण केले. न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय जर्नल ‘फायटोटाक्सा’मध्ये संशोधन २ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित झाले. पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांच्या नावाने नामकरण ‘स्टुडोक्सिटेननथेरा माधवी’ असे करण्यात आल्याचे डॉ. पी. तेताली यांनी सांगितले.

‘बांबू कॅपिटलनिर्मिती’साठी लोकसहभागातून प्रयत्न पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील भोर, वेल्हा व मुळशी तालुक्यांत बांबू लागवडी अधिक आहेत. मात्र त्यात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र बांबू प्रमोशन कौन्सिल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीराज व आत्मा, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. येणाऱ्या काळात ‘बांबू कॅपिटल’ म्हणून पश्‍चिम घाटाची ओळख व्हावी, यासाठी लोकसहभागातून प्रयत्न सुरू आहेत.

३८ वर्षअगोदर संशोधन करताना एक शेतकऱ्याने याबाबत माहिती दिली. यावर गेल्या काही वर्षांत संशोधन हाती घेण्यात आले होते. यासंबंधी आघारकर संस्थेत २०१९ निरीक्षणे घेण्यात आली. त्यानुसार ही नवी प्रजात समोर आली. - डॉ. पी. तेताली, वरिष्ठ शास्त्रज्ञ

‘स्टुडोक्सिटेननथेरा माधवी’ प्रजातीविषयी

  • व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची
  • प्रामुख्याने सह्याद्री पर्वत रंगांच्या पश्‍चिम घाटामध्ये आढळ
  • वेल्हा, भोर, मुळशी तालुक्यांत अधिक लागवडी करून घेतले जाते अधिक उत्पादन
  • बांबू ३० ते ५५ फुटांपर्यंत वाढ
  • आकर्षक चमक, मजबूत असल्याने बांधकाम आणि फर्निचर निर्मितीसाठी वापर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com