लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीची चर्चा

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीची चर्चा
लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीची चर्चा

मुंबई ः लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील, अशी जोरदार चर्चा गुरुवार सकाळपासून सुरू झाली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत, असे समजते. त्यामुळे विधानसभा विसर्जित करण्याच्या चर्चेला उधाण आले.   दरम्यान, लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे माध्यमांपुढे दिले. तसेच, लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याचा एवढा मोठा निर्णय फडणवीस सरकारने लपवला, तरी त्याची तयारी लपत नाही. सध्या अशी कोणतीच चिन्हे सरकारी पातळीवर दिसत नाहीत, असे बोलले जाते.  सध्याच्या वातावरणात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशात व महाराष्ट्रात मोदी व भाजपबद्दल पुलवामा व बालाकोट प्रकरणानंतरही म्हणावी तशी सहानुभूती जाणवत नाही. विविध वर्ग-जातीय आरक्षणाचा गोंधळ कायम आहे, ते ते जाती गट समाधानी नाहीत. तसेच, राज्यात फडणवीस सरकारकडे अजून सत्तेचे सहा महिने बाकी आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पात फक्त १६ टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. समृद्धीबाबतही अनेक अडथळे आहेत. हे दोन्हीही फडणवीसांचे ड्रीम प्रकल्प आहेत. सत्ता सोडणे इथे परवडणारे नाही. मुंबईतील कोस्टल रोड, पुणे मेट्रो प्रकल्पही आहेतच. राज्यातील धरणांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मतदान एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. दुष्काळ व पाणीटंचाईने त्रासलेली जनता सरकारवर रोष व्यक्त करू शकते. तुलनेत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरला निवडणुका घेतल्यास माॅन्सून येऊन गेलेला असतो. २०१४ ला भाजपला मिळालेल्या १२२ जागा हे त्यांचे अपवादात्मक यश आहे. आता निवडणुका घेऊन त्या जागा घटल्यास एकतर शिवसेनेचे उपद्रवमूल्य वाढू शकते किंवा प्रसंगी सत्ताही जाऊ शकते. १२२ च्या आसपास जागा आत्ता मिळणे अत्यंत अवघड आहे. लोकसभेच्या ४८ जागांमध्येही काही जागांवरून सर्वपक्षीय गोंधळ सुरू आहे. त्यातच २८८ची विधानसभा जाहीर झाल्यास नाराजांची संख्या वाढून त्याचा सर्वपक्षीयांना फटका बसू शकतो. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याचा एवढा मोठा निर्णय लपवला, तरी त्याची तयारी लपत नाही. सध्या अशी कोणतीच चिन्हे सरकारी पातळीवर दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एवढ्या मोठ्या निर्णयाची कुणकुण न लागणे शक्यच नाही. असले काहीही होणार असते, तर राष्ट्रवादीच्या खेम्यात मोठी खळबळ दिसून आली असती, तसे सध्या काहीच दिसत नाही. सहा विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ असतो. भाजपच्या किंवा सेनेला लोकसभेच्या ५ ते १० जागांवर फटका बसल्यास त्याचा त्या प्रमाणातला विधानसभेतही फटका बसू शकतो. तसेच, सरकार-सत्ता ही असीम ताकद असते. वाजपेयींनी १३ दिवसांच्या सरकारमध्येही अनेक निर्णय घेतले होते. अशा वेळी ६-७ महिन्यांची स्थिर सत्ता फडणवीस सोडणार नाहीत. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे लोकसभेच्या काही जागांबद्दलचा तिढा सोडवण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com