agriculture news in Marathi, discussion on farm issues in farmers barkari samelan, Maharashtra | Agrowon

शेतकरी वारकरी महासंमेलनात शेती विषयावर विचारमंथन

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

नगर ः शेतकरी मराठा महासंघातर्फे शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे होत असलेल्या शेतकरी- वारकरी महासंमेलनात शेतीच्या व्यथा मांडल्या जाणार आहेत. शेतकरी- वारकरी महासंमेलनाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून, पन्नास हजारांच्या जवळपास शेतकरी-वारकरी उपस्थित राहणार आहेत, असे महासंमेलनाचे आयोजक संभाजी दहातोंडे यांनी दिली. 

नगर ः शेतकरी मराठा महासंघातर्फे शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे होत असलेल्या शेतकरी- वारकरी महासंमेलनात शेतीच्या व्यथा मांडल्या जाणार आहेत. शेतकरी- वारकरी महासंमेलनाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून, पन्नास हजारांच्या जवळपास शेतकरी-वारकरी उपस्थित राहणार आहेत, असे महासंमेलनाचे आयोजक संभाजी दहातोंडे यांनी दिली. 

शेतकरी आत्महत्या थांबण्यासह शे़ती प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या बाबीवर चर्चा करण्यासाठी शनिशिंगणापूर येथे पहिल्याच शेतकरी-वारकरी महासंमेलन होत असून, गुरुवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी आकरा वाजता उद्घाटन होत आहे. अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील चारोधाम ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे महाराज असतील. 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रकात दादा पाटील, भास्कर गिरी महाराज, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, मंत्री विजय शिवतारे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार अहेत.

या संमेलनात डॉ. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला योग्य हमीदर मिळावा, नेवाशाला संतपीठ करावे, राज्यभर विभागवार वारकरी शिक्षण संस्था कराव्यात, शेतीमाल निविष्ठा नियामक मंडळ स्थापन करावे, यासह अन्य शेतीविषयक विषयांवर चर्चा होणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी वाकरऱ्यांची कशी मदत घेता येईल यावरही विचारमंथन होईल.

या वेळी गुजरातमधील खासदार सी. आर. पाटील यांचा समाजभूषण, स्व. बाबूराव बानकर यांचा जीवनगौरव, नारायण महाराज डौले यांचा वारकरी समाजभूषण, रंजना सुरेश बेल्हेकर यांचा शिक्षण समाजभूषण व श्रीधर ठाकरे यांचा कृषी समाजभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे, असे दहातोंडे म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...