पुणे जिल्ह्यातील आरोग्य, पेयजल योजनांबाबत चर्चा

Discussion on health, drinking water schemes in the district
Discussion on health, drinking water schemes in the district

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे रविवारी (ता. २९) पार पडली. या वेळी जिल्ह्यातील आरोग्य विभागावर चर्चा झाली असून यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पेजजल योजना, डीबीटी आणि जुन्नर तालुक्यातील शाळा पडल्याचे प्रकरण या बाबत चर्चा झाली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी सभापती प्रवीण माने, सुजाता पवार, राणी शेळके, सुरेखा चौरे, गटनेते शरद बुट्टे पाटील, रणजीत शिवतरे, आशा बुचके, दत्तात्रय झुरंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदि उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा आहे. राज्य शासनाकडून निधी आलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. मात्र, तोपर्यंत रुग्णांना उपचार द्यायचे नाही का असा प्रश्न सदस्य शरद बुट्टे पाटील व रणजीत शिवतरे यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने निधीची वाट न पाहता तत्काळ औषधे खरेदीसाठी प्रत्येक पीएससीला ३५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. 

जेणेकरून या निधीमधून औषधे खरेदी करता येतील, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा. या योजनेचा निधी परत जाऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामे मार्गी लावावीत. जुन्नर तालुक्यातील शाळा पाडल्याप्रकरणी आशा बुचके यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर अध्यक्षांनी तत्काळ चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव दरम्यान बैठकीनंतर सदस्यांनी अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत विश्वासराव देवकाते यांनी तीन वर्षांत पक्षपातीपणा न करता प्रत्येक सदस्याला न्याय दिला. जिल्हा परिषदेच्या विकासाला गती दिली असल्याचे मत सदस्य आशा बुचके यांनी मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com