राजू शेट्टींच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा 

Discussion on inclusion of Raju Shetty's cabinet
Discussion on inclusion of Raju Shetty's cabinet

कोल्हापूर : शेतकरी प्रश्‍नांवर सातत्याने सरकार विरोधी आंदोलने करून लोकप्रियता मिळवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांची चर्चा संभाव्य मंत्रिमंडळात होत असल्याने दक्षिण महाराष्ट्राच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. श्री. शेट्टी यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा बूस्टर डोस मिळण्याची शक्‍यता आहे. 

सत्तेच्या सारिपाटात गेल्या सहा महिन्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रचंड बॅकफुटवर गेली. राजू शेट्टी यांचा खासदारकीला पराभव झाल्याने ‘स्वाभिमानी’ निराश झाली. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही सावकार मादनाईक या योद्ध्यालाही हार पत्करावी लागली. यामुळे संघटनेचे प्राबल्य असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्रात संघटनेचे स्वातंत्र्य संपते की काय, अशी भीती निर्माण झाली. संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे निवडून आले. पण, पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाबाबत संघटनेच्या मनात खदखद राहिलीच. 

सक्षम मंत्र्यांच्या शोधात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये शेट्टी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. मित्रपक्षांना सामावून घेताना शेट्टी यांचा समावेश करण्यास शरद पवार यांचीही अनुकूलता असू शकते. हा निर्णय झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दीर्घ काळानंतर जल्लोषाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा नाशिक ः ‘‘राज्य आता भाजपच्या जोखडातून मुक्त झालंय. पण यासाठी सर्वांत जास्त मोठं योगदान कोणाचं असेल, तर ते आमचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचं. जेव्हा सगळेजण भाजपकडे वळत होते. मात्र, ते शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहिले. म्हणूनचं आपल्यासारखं प्रामाणिक नेतृत्व कृषिमंत्रिपदी विराजमान व्हावं हीच इच्छा.’’ अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर येणाऱ्या मॅसेजमध्ये दिसून येत आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com