agriculture news in Marathi discussion of milk mixing is threat Maharashtra | Agrowon

दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट आणणारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र ५० लाख लिटर दूध भेसळीचे असल्याने दर देता येत नसल्याचा मुद्दा कपोलकल्पित आहे.

पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची कारणे वेगवेगळी आहेत. मात्र ५० लाख लिटर दूध भेसळीचे असल्याने दर देता येत नसल्याचा मुद्दा कपोलकल्पित आहे. भेसळीच्या या चर्चेमुळे राज्याच्या डेअरी उद्योगावर संकट येऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संघाने दिला आहे. 

दुधाच्या भेसळीबाबत संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पवार, कोशाध्यक्ष डॉ. विवेक क्षीरसागर भूमिका मांडली. ‘‘राज्यात सध्या ११९ लाख लिटर दूध येते आहे. त्यात ५० लाख लिटर दुधात भेसळ असल्याची चर्चा अकारण घडवून आणली जात आहे. यामुळे डेअरी उद्योगाची बदनामी होत असून त्याचा फटका पुन्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच बसेल,’’ असेही संघाने स्पष्ट केले आहे. 

मुलापेक्षाही ब्रॅंडला जपतो ः कुतवळ 
‘‘प्रत्येक डेअरीकडून स्वतःच्या मुलांपेक्षाही आपल्या ब्रॅंडची काळजी घेतली जात आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत दूध व्यावसायिक गैरकृत्यात सहभागी असतील. मात्र अशा व्यावसायिकांना चाप लावण्याचे काम अन्न व औषध प्रशासन करीत आहे. सर्वच दूध व्यावसायिक शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना दर देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र भेसळीची चर्चा उगाच उकरून काढली जाते. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत ५० टक्के दूध परराज्यांतील ब्रॅंडच्या हातात गेले आहे,’’ असे संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांचे म्हणणे आहे. 

शेतकरी भरपूर कष्ट घेतात ः चितळे 
चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे यांनी सांगितले, की भेसळीचा मुद्दा गौण आहे. तो उकरून काढल्यास ग्राहकांकडून दूध घेणे कमी होऊ शकते. त्यातून दर कमी होऊन, शेवटी शेतकऱ्यांना फटका बसेल. दूध वाढीवर सर्वांत चांगला उपाय शेतकऱ्याचे दूध उत्पादन वाढविणे व त्यासाठी सुधारित लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रा पुरवणे हाच आहे. या नव्या तंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व आणखी गुणवत्तापूर्ण दूध मिळेल. सध्याच्या व्यवस्थेत दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांकडून भरपूर कष्ट घेतले जातात. मात्र त्यांना सुधारित मात्रा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सुदैवाने राज्यात सरकारने तशी सुरुवात देखील केली आहे.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...