Agriculture news in Marathi Discussion in Mumbai about 'Gokul' | Agrowon

‘गोकुळ’बाबत मुंबईत खलबते

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, ‘गोकुळ’चे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्यात मुंबईत खलबते झाली.

कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, ‘गोकुळ’चे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्यात मुंबईत खलबते झाली. सुमारे तासभर चर्चा झाली; पण त्यात ठोस निर्णय झाला नाही. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याचे ठरले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळ निवडणूक प्रक्रिया मात्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पी. एन., मुश्रीफ यांच्या भेटीवेळी ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार मुंबईत या दोघांसह पालकमंत्री पाटील यांच्यात चर्चा झाली.

जिल्हा बॅंक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध व्हावी, यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. यात त्यांना ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचे नेते पी. एन. व महादेवराव महाडिक यांचे सहकार्य आवश्‍यक आहे. त्याच पद्धतीने ‘गोकुळ’मध्ये सत्ताधाऱ्यांना मुश्रीफ आपल्यासोबत राहिले, तर केडीसीत सहकार्य करू, अशी तोडजोडीची भूमिका आहे. याचवेळी महाडिक यांचा अडथळा आहे. मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांना महाडिक नको आहेत. तर पी. एन. यांना महाडिक यांची साथ हवी आहे. ‘गोकुळ’मध्ये तडजोड करताना हाच कळीचा मुद्दा ठरतो आहे. त्यामुळे या तिघांमध्ये तासभर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नाही.

‘गोकुळ’विरोधात मुश्रीफ यांच्या तुलनेत पालकमंत्री पाटील आघाडीवर आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडविताना महाडिक यांच्या वाट्याला जागा किती, हा वादाचा विषय होऊ शकतो. महाडिक यांना मानणारे एक-दोन संचालक असतील. सतेज पाटील यांनी यावर आक्षेप घेऊ नये, अशी भूमिका मुश्रीफ यांनी या बैठकीत मांडल्याचे समजते. गत गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ सत्ताधाऱ्यांसोबत होते. त्यानंतर त्यांना पाच वर्षांत बेदखल केले, ही वस्तुस्थिती होती. तरी जिल्हा बॅंकेसाठी मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.  

त्यामुळेच सतेज पाटील चर्चेत
‘गोकुळ’च्या लढाईत मुश्रीफ यांना सोबत घेतल्याशिवाय कोणाची एकहाती सत्ता येणार नाही, हे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत; परंतु मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंक समोर ठेवून चर्चा सुरू ठेवली आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांच्यासोबत सतेज पाटील यांनाही चर्चेत घेतले आहे, असे कळते.


इतर ताज्या घडामोडी
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...