agriculture news in Marathi, Discussion on poultry fodder subsidy on tomorrow, Maharashtra | Agrowon

अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या मंथन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला दिलासा देण्याकरिता उद्या (ता. २४) दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनुदानावर धान्य उपलब्धतेसंदर्भात या बैठकीत पोल्ट्री व्यवसायिकांशी चर्चा केली जाणार आहे. 

नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला दिलासा देण्याकरिता उद्या (ता. २४) दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनुदानावर धान्य उपलब्धतेसंदर्भात या बैठकीत पोल्ट्री व्यवसायिकांशी चर्चा केली जाणार आहे. 

राज्यात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे पोल्ट्री उद्योगासह डेअरी उद्योगही अडचणीत आला असून, उत्पादकता खर्चात वाढ झाली आहे. परिणामी अंड्यांचा प्रतिनग उत्पादन खर्च ४ रुपये, तर विक्री प्रतिनग ३ रुपये १५ पैशाने होत आहे. देशभरात सध्या अशीच स्थिती असल्याने पोल्ट्री उद्योग संक्रमणावस्थेतून जात आहे. 

दिल्लीत जंतरमंतरवर याच मुद्द्यावर आंदोलनही करण्यात आले; परंतु त्यानंतरही स्थितीत सुधारणा होत नसल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्यांतर्गत असलेले धान्य अनुदानावर देण्याची मागणी व्यवसायिक करीत आहेत. या संदर्भाने वारंवार पाठपुरावा करण्यात आला.

नॅशनल एग को-आॅर्डिनेशन कमिटीचे राज्य अध्यक्ष शाम भगत यांनीदेखील प्रयत्न चालविले आहेत. त्याची दखल घेत मंगळवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता पशुसंवर्धन खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. प्रत्येक विभागातून एक कुक्‍कुटखाद्य निर्मिती व्यवसायिक व विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रगत कुक्‍कुट व्यावसायिक यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...