Agriculture news in marathi Discussion of shoulder shift in Akola Zilla Parishad | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर असल्याने नेतृत्व बदलाचा प्रयोग जिल्हा परिषदेत होऊ शकतो.

अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर असल्याने नेतृत्व बदलाचा प्रयोग जिल्हा परिषदेत होऊ शकतो. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विषयी काही सदस्य व कार्यकर्त्यांनी ‘वंचित’च्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने या हालचालींना दुजोरा मिळत आहे. 

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सर्वाधिक २५ सदस्य संख्या होती. संख्याबळाच्या आधारे सत्ता आली. एक-सव्वा वर्षातच अंतर्गत कुरबुरी, तक्रारी सुरू झाल्या. सत्ता आल्यापासून विद्यमान पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत तितकासा प्रभाव टाकता आलेला नाही. सभागृहात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरत असल्याचे दिसून आले. पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवरही अंकुश नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सदस्यांची काही पदे गेली. 

सध्या सत्तेत महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांना प्रशासकीय कामकाजाचा या पूर्वीचा काहीही अनुभव नाही. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यातही सक्षम ठरत नसल्याचा सूर आहे. अशा अनेक बाबी विद्यमान पदाधिकाऱ्यांविरुद्ध थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारींचा ओघ वाढत असल्याने नेतृत्व बदलाबाबत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक स्वतः पदाधिकारी असल्याच्या तोऱ्यात वागत असून, वारंवार हस्तक्षेप करीत असल्यानेही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही पदाधिकाऱ्यांचे मुलगा, पती, कुटुंबातील अन्य सदस्य यांचा जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने वावर असतो. 

या बाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे अंतिम भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. तर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा घ्यायचे की जबाबदारी निश्चित करायची, हे ठरविले जाईल, असे वंचितच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. 
 


इतर बातम्या
भुईमूग पिवळा पडला; शेंग धारणाही कमीयवतमाळ : जिल्ह्यात यंदा सोयाबीननंतर उन्हाळी...
नागपुरात पावणेपाच लाख हेक्‍टरवर...नागपूर :  जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी १ लाख...
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरूसांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून...
कोरोनाग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले...लांजा, जि. रत्नागिरी : कोरोनाची लागण झाल्याने...
कादवा कारखान्याकडून पाच लाख क्विंटल...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात दहा दिवस बाजार...बुलडाणा : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
‘माझा डॉक्टर’  बनून मैदानात उतरामुंबई  : राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील...
जागतिक तापमानवाढीमुळे आशियातील पर्वतीय...हवामान बदलामध्ये बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेमुळे...
ग्रामपंचायतीच्या १६ सदस्यांवर  कारवाईची...अमरावती : चांदूर बाजार तालुक्यात ८१४ पैकी २८२...
विदर्भात आज घेतला जाणार खरीप हंगामाचा...नागपूर : विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक...
माझा जीव, माझी जबाबदारी : राधाकृष्ण...नगर  : ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि...
मांडाळखळी येथील शेतकऱ्यांनी  घेतले ओवा...परभणी ः येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे नवीन...
कोरोना संसर्गाच्या लाटेतही बदल्यांची...नगर : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील बदल्यांची...
नगर जिल्ह्यात आंबा  विक्रीच्या अडचणींत...नगर ः आंबा विक्रीचा सीझन सुरू आहे. मात्र कोरोना...