Agriculture news in marathi Discussion of shoulder shift in Akola Zilla Parishad | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर असल्याने नेतृत्व बदलाचा प्रयोग जिल्हा परिषदेत होऊ शकतो.

अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराजीचा सूर असल्याने नेतृत्व बदलाचा प्रयोग जिल्हा परिषदेत होऊ शकतो. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विषयी काही सदस्य व कार्यकर्त्यांनी ‘वंचित’च्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने या हालचालींना दुजोरा मिळत आहे. 

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सर्वाधिक २५ सदस्य संख्या होती. संख्याबळाच्या आधारे सत्ता आली. एक-सव्वा वर्षातच अंतर्गत कुरबुरी, तक्रारी सुरू झाल्या. सत्ता आल्यापासून विद्यमान पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत तितकासा प्रभाव टाकता आलेला नाही. सभागृहात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर वरचढ ठरत असल्याचे दिसून आले. पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवरही अंकुश नाही. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सदस्यांची काही पदे गेली. 

सध्या सत्तेत महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांना प्रशासकीय कामकाजाचा या पूर्वीचा काहीही अनुभव नाही. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यातही सक्षम ठरत नसल्याचा सूर आहे. अशा अनेक बाबी विद्यमान पदाधिकाऱ्यांविरुद्ध थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारींचा ओघ वाढत असल्याने नेतृत्व बदलाबाबत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक स्वतः पदाधिकारी असल्याच्या तोऱ्यात वागत असून, वारंवार हस्तक्षेप करीत असल्यानेही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही पदाधिकाऱ्यांचे मुलगा, पती, कुटुंबातील अन्य सदस्य यांचा जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने वावर असतो. 

या बाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे अंतिम भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. तर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा घ्यायचे की जबाबदारी निश्चित करायची, हे ठरविले जाईल, असे वंचितच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...