ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चा

दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कामगार प्रतिनिधींना ते लवकरच चर्चेस बोलविणार आहेत. दुसऱ्या बाजूला साखर संघाने देखील सोमवारी (ता. २१) पुन्हा चर्चा करण्याचे ठरविले आहे.
Discussion today on sugarcane harvesting
Discussion today on sugarcane harvesting

पुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कामगार प्रतिनिधींना ते लवकरच चर्चेस बोलविणार आहेत. दुसऱ्या बाजूला साखर संघाने देखील सोमवारी (ता. २१) पुन्हा चर्चा करण्याचे ठरविले आहे.

एरवी जयंत पाटील व पंकजा मुंडे यांच्या लवादाची मध्यस्थी ऊस तोडणी कामगार मान्य करतात. यंदा मात्र थेट पवार यांनीच निर्णय घेण्याचा आग्रह कामगारांचा आहे. कोरोनामुळे राज्यातील साखर कारखाने यंदा संकटात आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक तोडगा काढावा व जास्त मुद्दा न ताणता सहकार्याची भावना ठेवत हंगाम सुरू व्हावा, असे मत संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी यापूर्वीच्या बैठकीत मांडली होती. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील समन्वयाची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार,  कामगारांची भूमिका मांडायची असल्याबाबत श्री. पवार आम्ही यांना भेटीची वेळ मागितली होती. त्यांनी तात्काळ चर्चेला बोलवले. श्री. पवार यांच्यासोबत प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. आम्हाला त्यांच्या पातळीवरच योग्य न्याय मिळू शकतो. इतरांची मध्यस्थी आम्हाला नको आहे, अशी भूमिका आमची आहे. श्री. पवार यांनीही आमची भावना समजून घेत चर्चेला लवकरच बोलविण्याचे ठरविले आहे.

तिढा लवकर सोडवावा दरम्यान, १५ ऑक्टोबरनंतर तोडणी सुरू करता येईल. मात्र, कारखानदार व कामगारांमध्ये तयार झालेला तिढा लवकर सोडवावा, असे ऊसतोडणी कामगार संघटना तथा संघर्ष समितीच्या सुशीलाताई मोराळे, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांचे म्हणणे आहे. कोरोनाची समस्या कारखान्यांसमोर असली तरी तोडणी कामगार देखील अडचणीत आहेत. कामगारांना पाच लाखाचा विमा व मजुरीमध्ये दुप्पट वाढ हवी, असे तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com