Agriculture news in Marathi Discussion today on sugarcane harvesting | Page 2 ||| Agrowon

ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कामगार प्रतिनिधींना ते लवकरच चर्चेस बोलविणार आहेत. दुसऱ्या बाजूला साखर संघाने देखील सोमवारी (ता. २१) पुन्हा चर्चा करण्याचे ठरविले आहे.

पुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कामगार प्रतिनिधींना ते लवकरच चर्चेस बोलविणार आहेत. दुसऱ्या बाजूला साखर संघाने देखील सोमवारी (ता. २१) पुन्हा चर्चा करण्याचे ठरविले आहे.

एरवी जयंत पाटील व पंकजा मुंडे यांच्या लवादाची मध्यस्थी ऊस तोडणी कामगार मान्य करतात. यंदा मात्र थेट पवार यांनीच निर्णय घेण्याचा आग्रह कामगारांचा आहे. कोरोनामुळे राज्यातील साखर कारखाने यंदा संकटात आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक तोडगा काढावा व जास्त मुद्दा न ताणता सहकार्याची भावना ठेवत हंगाम सुरू व्हावा, असे मत संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी यापूर्वीच्या बैठकीत मांडली होती. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील समन्वयाची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार,  कामगारांची भूमिका मांडायची असल्याबाबत श्री. पवार आम्ही यांना भेटीची वेळ मागितली होती. त्यांनी तात्काळ चर्चेला बोलवले. श्री. पवार यांच्यासोबत प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. आम्हाला त्यांच्या पातळीवरच योग्य न्याय मिळू शकतो. इतरांची मध्यस्थी आम्हाला नको आहे, अशी भूमिका आमची आहे. श्री. पवार यांनीही आमची भावना समजून घेत चर्चेला लवकरच बोलविण्याचे ठरविले आहे.

तिढा लवकर सोडवावा
दरम्यान, १५ ऑक्टोबरनंतर तोडणी सुरू करता येईल. मात्र, कारखानदार व कामगारांमध्ये तयार झालेला तिढा लवकर सोडवावा, असे ऊसतोडणी कामगार संघटना तथा संघर्ष समितीच्या सुशीलाताई मोराळे, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड यांचे म्हणणे आहे. कोरोनाची समस्या कारखान्यांसमोर असली तरी तोडणी कामगार देखील अडचणीत आहेत. कामगारांना पाच लाखाचा विमा व मजुरीमध्ये दुप्पट वाढ हवी, असे तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे म्हणणे आहे.


इतर ताज्या घडामोडी
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...