सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी संकलनावरुन चर्चेचे गुऱ्हाळ

सोलापूर ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात महिन्यातून पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.१०) झाली. पण, या सभेत ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही.
Discussions in Solapur Zilla Parishad on Cess Fund, Tax Fund Collection
Discussions in Solapur Zilla Parishad on Cess Fund, Tax Fund Collection

सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात महिन्यातून पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.१०) झाली. पण, या सभेत ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. केवळ सेसफंडाच्या निधी खर्चास मिळालेली स्थगिती, करनिधी या विषयावर चर्चेचे नुसतेच गुऱ्हाळ रंगले. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. विषय पत्रिकावरील तीन आणि आयत्या वेळचे तब्बल २९ विषय होते. पण, त्यापैकी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करणे व सेसफंडाच्या खर्चास मंजुरी देण्याच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

बाकी आरोग्याच्या प्रश्नावर आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यापलीकडे या सभेतून काहीच निष्पन्न झाले नाही. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सेसफंड वाटपाबाबत तक्रार होती. सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी कल्याणशेट्टी यांचा निषेध करीत आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली. त्यावरुन भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही सदस्य आमने-सामने आले. जिल्हा परिषदेतील करनिधी संकलनाची गेल्या तीन वर्षांमध्ये एकही बैठक झाली नाही. मुद्रांकशुल्काचे उत्पन्न बुडाले. दोन-अडीच कोटी रुपयांचा फटका झेडपीच्या उत्पन्नास बसला? त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले.

या दोन्ही विषयावर चर्चेचे गुऱ्हाळ बराच वेळ सुरु राहिले. पण, या सभेत कोणत्याच विषयावर ठाम निर्णय झाला नाही. आयत्या वेळच्या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.

गटविकास अधिकाऱ्यांची टक्केवारी

ग्रामपंचायतीच्या बिल मंजुरीसाठी ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांचे संयुक्त खाते आहे. पण, सह्यांसाठी काही गटविकास अधिकारी टक्केवारी घेत असून, त्यांची मागणी आता वाढली आहे. ती दोन टक्क्यांच्या पुढे गेल्याची तक्रार विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केली. त्यावरुन काही सदस्य आक्रमक झाले, त्यांनी प्रशासनावर चांगलाच प्रहार केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com