agriculture news in Marathi, Disease attack on cane, Maharashtra | Agrowon

उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबके

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
  • दररोजचे धुके व जमिनीतील ओलसरपणा, असे वातावण सातत्याने असल्याने ऊस रोगाला बळी पडत आहे. कोवळ्या व लुसलुशीत पानावर चटक तांबेरा येतो. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन फवारणीचे नियोजन करावे.

- विलास करडे, पीक रोगशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय

कोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील ओलसरपणाचा फटका उभ्या उसाला बसत आहे. या वातावरणामुळे उसावर तांबेरा व तपकिरी ठिबक्‍यांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महापुराच्या तडाख्यातून वाचलेल्या उसावर आता बदलत्या हवामानाने वक्रदृष्टी केल्याने दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक पुन्हा दुष्टचक्रात अडकत आहेत. नेमका किती क्षेत्रावर हा प्रादुर्भाव आहे, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली, तरी वाढणारे क्षेत्र उत्पादकांना चिंतेत टाकणारे आहे. 

ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात सत्तर हजार हेक्‍टरपेक्षा अधिक उसाचे नुकसान झाले. पण, गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पुरात न बुडलेल्या उसाला बसत आहे. जोरदार पावसामुळे ऊसशिवारे अद्याप ओलसर आहेत. जमिनीत ओलावा टिकून आहे. यातच दररोज धुके पडत असल्याने याचा विपरीत परिणाम उसावर होत आहे. विशेष करून ९२००५, २६५ या ऊस जातींवर तांबेरा, ठिबक्‍यांचे प्रमाण वाढत आहे. नवीन लागवड व गाळपास येणारा ऊस या दोन्हींवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. तोडणीस आलेल्या उसाला आता काही करता येणे शक्‍य नाही.

पण, जो ऊस अद्याप कोवळा आहे, त्या उसाला फवारणी आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुरू व पूर्वहंगामी लागवडीच्या उसावर तांबेरा व तपकिरी ठिबक्‍याचा प्रादुर्भाव होत आहे. अनेक ठिकाणी चारफुटीपेक्षा कमी अंतर असलेल्या सरीतील उसामध्ये हे संकट गडद होत आहे. शेतातील पाणी साचून राहिल्याने याचा धोका अधिक वाढत आहे. कोवळ्या उसावर तातडीने फवारणी करून उसाचा यापासून बचाव करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

प्रतिक्रिया
उशिरा झालेला पाऊस व ढगाळ हवामानमुळे उसावर जलद तांबेरा येत आहे. लहान व मोठ्या उसावरही याचा प्रादुर्भाव आहे. तोडणीस येणाऱ्या उसावर आता उपाय करणे शक्‍य नसले, तरी कोवळ्या उसाकडे मात्र लक्ष देणे गरजेचे आहे. 
- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर 

 


इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...