agriculture news in Marathi disease attack on tomato Maharashtra | Agrowon

टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा प्रादुर्भाव 

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेले तापमान यामुळे पूर्वहंगामी टोमॅटो लागवडी लांबणीवर गेल्या आहेत.

नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेले तापमान यामुळे पूर्वहंगामी टोमॅटो लागवडी लांबणीवर गेल्या आहेत. त्यातच अजूनही कोरोना व टोमॅटो पिकातील  विषाणूजन्य रोग याबाबतच्या अफवांच्या भीतीमुळे टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना हवामान बदल व तापमान वाढीमुळे चांदवड, येवला तालुक्यात टोमॅटो पिकावर जीवणूजन्य ठिपक्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

चांदवड, येवला व काही प्रमाणात दिंडोरी व निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी जोखीम घेत पूर्वहंगामी टोमॅटो लागवडी केल्या आहेत. मात्र पाऊस वेळेवर न झाल्याने हवामानात बदल झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे उष्ण व दमट वातावरणामुळे तापमान वाढ झाल्याने लागवडीसाठी बाधक ठरते आहे. मे महिन्याच्या अखेरीस लागवडी सुरू होऊन जूनअखेर सुरू होत्या.

आता अनेक ठिकाणी फळधारणा होऊन फळे पक्वतेच्या अवस्थेत आहेत. मात्र त्यावर जीवणूजन्य ठिपक्या रोगांमुळे फळे खराब होऊ लागली आहेच. त्यामुळे मागणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फळांचा आकार व डागांमुळे प्रतवारी बिघडल्याने अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

प्रतिक्रिया
हवामान बदल व तापमान वाढ या मुळे प्रादुर्भाव वाढत आहे. सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या वातावरण जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशक आणि प्रतिजैविके यांचा वापर करावा.  फवारण्या करताना संपूर्ण पिकाला ‘कव्हरेज’ होईल याकडे लक्ष द्यावे.
-प्रा.तुषार उगले, किटकशास्त्र विभाग, के.के.वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक

उष्णता वाढल्याने हा प्रादुर्भाव आहे. मात्र वेळीच उपाययोजना करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन फवारण्या घेतल्याने प्रादुर्भाव कमी केला आहे. 
-किरण लभडे, टोमॅटो उत्पादक, निमगाव मढ, ता. येवला.


इतर अॅग्रो विशेष
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...