agriculture news in marathi, disease on ginger crop, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आले पिकात कंद पोसण्याची अवस्था सुरू असून, पालाशयुक्त खते पिकाला देणे गरजेचे आहे. करपा व सूक्ष्म अन्नद्रव्याचे योग्य निरिक्षण करावे व गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्य तसेच शिफारसीत बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात. पाने जास्तीत जास्त दिवस क्रियाशील राहण्यासाठी खत व्यवस्थापन व पीक संरक्षणावर भर द्यावा. यामुळे कंद चांगला पोसला जाईल.  
- भुषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा.

सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे आले पिकालाही बसला आहे. जिल्ह्यात सध्या आले पिकावर ‘करपा’चा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या ‘करपा’मुळे फणी पोसण्यावर परिणाम होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

मागील चार ते पाच वर्षांपासून आले पिकास समाधानकारक दर मिळाल्याने जिल्ह्यात या पिकाखालील क्षेत्र वाढले.  यंदा २५०० ते २७०० हेक्टर क्षेत्रावर आले पिकाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात आले पिकात मोठ्या प्रमाणात कंदकुज झाली होती. ती आटोक्यात आणण्यास शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले होते. या संकटातून कसेबसे बाहेर पडत असतानात आता ‘करपा’च्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हिरवीगार असणारे आले पीक आता पिवळे पडून सुकू लागले आहे. सुरुवातीस आले पिकास पांढरे डाग पडून त्यास छिद्र पडत असून त्यानंतर पाने वाळून जात आहेत. अतिपावसाने जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढल्याने आर्द्रता निर्माण होत असल्यानेही करपा वाढत आहेत. काही ठिकाणी करपा ओळखण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. काही ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमरततेमुळे देखील पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. करप्याच्या प्रादुर्भावामुळे आल्याच्या पानांची गळती होते. यातून आल्याच्या कंद पोसत नाही. परिणामी आले उत्पादनात घट होते. कंदकुज, करपा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारण्यांवर भर दिला आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. 

आल्याला समाधानकारक दर मिळत असल्याने आले पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र अतिपावासमुळे एकूण आले लागवडीपैकी ४०० ते ५०० एकर क्षेत्रावर कंदकुज झाल्याचे दिसून येत आहे. ही कंदकुज नियंत्रण येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आले काढणी करुन त्याची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या बाधित आल्याची निम्म्याहून कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...