agriculture news in marathi Diseased pomegranate in Sangola Inspection of gardens by experts | Agrowon

सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची तज्ज्ञांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि सातत्याच्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि सातत्याच्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मंगळवारी (ता. २७) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या विविध तज्ज्ञांकडून करण्यात आली.

सांगोला तालुक्यातील संगेवाडी, कोळा, जुनोनी या गावातील डाळिंबावरील कीड व रोगाची पाहणी या पथकाने केली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. ज्योत्सना शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. सोमनाथ पोखरे, कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प महात्मा कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ अशोक वाळुंज, डॉ. प्रकाश मोरे, तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव काटे, मध्यवर्ती विज्ञान समितीचे उपाध्यक्ष बरमु दुधाळ, संचालक खंडेराव मदने उपस्थित होते.

शास्त्रज्ञांनी विलास खंडागळे, सूर्यकांत खंडागळे, सन आलदर व लक्ष्मी माळी यांच्या डाळिंब बागेतील तेल्या व मर रोगाच्या जळालेल्या झाडांची पाहणी करून शेतकऱ्यांना या रोगाविषयी सविस्तर माहिती दिली. 

योग्यवेळी फवारणी करा

‘‘डाळिंबावरील विविध रोगाच्या नियंत्रणासाठी त्याचे व्यवस्थापन योग्य झाले पाहिजे. योग्य वेळी, योग्य औषधांची निवड करून फवारणी झाली पाहिजे. बागेवर औषधातील फवारणी करताना औषधातील घटकांची माहिती करून घेणे गरजेचे आहे’’, असे मत डॉ. शर्मा यांनी व्यक्त केले. ‘‘शेतकऱ्यांनी बागेची वेळोवेळी स्वच्छताही केली पाहिजे. आव्हान मोठे आहे. आपण ते पेलले पाहिजे’’, असेही त्या म्हणाल्या.


इतर बातम्या
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरूचपुणे ः राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र,...
ई-पीक पाहणीत एक गुंठा क्षेत्रात पीक...जळगाव : एक गुंठा क्षेत्रात ई-पीक पाहणी अॅपद्वारे...
द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
परभणी, हिंगोलीत संततधार सुरूच परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत...
कोल्हापूर जिल्ह्यात  भारत बंदला संमिश्र...कोल्हापूर : शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील...
‘पीएम किसान’च्या कामाची ‘कृषी’, ‘महसूल’...जळगाव : खानदेशात पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कृषी परिषद, विद्यापीठाला उच्च...पुणे ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या...
भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद अकोला : शेतकरी, कामगार कायदे तसेच वाढत्या महागाई...
‘एफआरपी’च्या तुकड्यांसाठी  राज्य...कोल्हापूर : केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे...
सोलापूर : डाळिंब केंद्रातर्फे शेतकरी,...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन...
परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद परभणी : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी...
उत्तर सोलापुरात  अतिवृष्टीने पिकांचे...वडाळा, (जि. सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून...
‘भारत बंद’च्या माध्यमातून  केंद्र...नाशिक : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे व...
वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात  चंद्रपुरात...चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची तसेच...
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...