agriculture news in Marathi disorder in assembly over farmers loan waiver scheme Maharashtra | Agrowon

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत येताना त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र, अद्याप त्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरूच असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २४) केला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतरही भाजप सदस्यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले होते. 

मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत येताना त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र, अद्याप त्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरूच असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २४) केला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतरही भाजप सदस्यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले होते. 

फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊ, असे सरकारने सांगितले होते. मात्र, यातील एक नवा पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. त्याचबरोबर कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावू, असेही या सरकारने सांगितले होते. तसेच, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, त्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासनही देण्यात आले होते.

मात्र, यापैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून, ही फसवणुकीची मालिका अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने आम्ही हे विषय सभागृहात मांडणार आहोत.’’ 

विधान परिषदेतही गोंधळाची स्थिती कायम होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्रे सभागृहासमोर ठेवण्यात आली.

गोपीकिशन बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली. त्यापूर्वी कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली. सुभाष देसाई आधी सभागृहनेते होते. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...