नागमठाणवरून दीड लाख क्युसेकचा विसर्ग

नागमठाणवरून दीड लाख क्युसेकचा विसर्ग
नागमठाणवरून दीड लाख क्युसेकचा विसर्ग

औरंगाबाद : गोदावरीला आलेल्या पुरामुळे नागमठाणवरून सुरू असलेला दीड लाख क्‍युसेकपेक्षा जास्तीचा विसर्ग मंगळवारीही (ता. ६) सुरू होता. दरम्यान, पूरग्रस्तांना सहाय्यता करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक गंगापूर तालुक्‍यातील जुने कायगाव येथे मंगळवारी दुपारी दाखल झाले.

नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्‍वरमधून जायकवाडीच्या दिशेने होत असलेला विसर्ग २ लाख ८० हजार क्‍युसेकवर पोचला. तो मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ७० हजार ९६२ क्‍युसेकवर आला. नागमठाणमधून मात्र सलग तिसऱ्या दिवशीही १ लाख ५० हजार ८३२ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दुपारी ३ वाजताच्या सुमारास जायकवाडीतील एकूण पाणीसाठा १६०४.४६२ दलघमी (५६.६५ टीएमसी) वर, तर जिवंत पाणीसाठा ८६६.३५९ दलघमी (३०.५९ टीएमसी) वर पोचला. भंडारदरामधून ३४०५ क्‍युसेक, निळवंडे ९१८०, ओझरवेअरमधून १७१८८, भावली ७०१, दारणा ५३२४ क्‍युसेक, मुकने ५००, वालदेवी २६६४, गंगापूर ३४३०, पालखेड १३११६, कडवा ३०३८, तर आळंदीतून १२६३ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

अनेक वर्षानंतर उघडे पडलेले खडकुली गाव आता पुन्हा पाण्याखाली गेले आहे. जुने कायगाव परिसरातील अनेक वस्त्यांजवळ पाणी पोचले. अमळनेर वस्तीजवळील आठ ते दहा वस्त्यांमधील घरांजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास पाणी पोचल्याचे सूत्रांनी सांगितले. कायगाव टोक शिवारात नदीपात्राबाहेर जवळपास एक किलोमीटरपर्यंत पाणी पसरले.

वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी नेवरगाव परिसरात पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही तालुक्‍यातील जवळपास १७ गावांतील ५०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांना पाणी व राशनची सुविधा पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com