Agriculture news in marathi, Disposal of water resources in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारक

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नाही. ८२४ लघू मध्यम प्रकल्पांपैकी ३७४ प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. शिवाय अकरापैकी सहा मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ६.२३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत तर पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नाही. ८२४ लघू मध्यम प्रकल्पांपैकी ३७४ प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. शिवाय अकरापैकी सहा मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७४९ लघू प्रकल्पांत केवळ ६.२३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत तर पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे चित्र आहे.

 नाशिक, नगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरातून जवळपास भरत आलेल्या जायकवाडी प्रकल्पाची स्थिती वगळता मराठवाड्यातील लहान मोठे प्रकल्प, बंधारे अजूनही तहानलेलेच आहेत. अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिध्देश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. ७४९ लघू प्रकल्पांमध्ये केवळ ६.२३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. त्यामध्ये जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अजूनही एक टक्‍क्‍यापुढे गेली नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १३ टक्‍के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ३० टक्‍के, तर हिंगोलीमधील २६ लघू प्रकल्पांत २८ टक्‍केच पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० प्रकल्प कोरडेठाक आहेत. ३१ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ पैकी तब्बल १० मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. लातूरमधील ८ पैकी २, बीडमधील १६ पैकी ९, जालन्यातील ७ पैकी १, तर औरंगाबादमधील १६ पैकी ८ मध्यम प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. 

औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पांत २१, बीडमधील १६ प्रकल्पांत केवळ १ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७, परभणीतील २ प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. ७४९ पैकी ३४४ लघु प्रकल्पांत पाण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. २६३ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे. औरंगाबादमधील ४३, जालन्यातील ३७, बीडमधील ९५, लातूरमधील ४६, उस्मानाबादमधील १२३ लघू प्रकल्प कोरडे आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...
यवतमाळमध्ये साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी...यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्‍...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी...यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे...
आंबेओहळ प्रकल्पासाठी निधीची मागणी कोल्हापूर : उत्तूरसह परिसरातील जवळपास २२हून अधिक...
नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही...
चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन,...सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या...
पशुचिकित्सा शिबिरे रद्द, जनावरांच्या...कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली दोन...
पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग...