नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत व्यत्यय
जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी केंद्रांतील कापूस आणणाऱ्या वाहनांची गर्दीदेखील वाढत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक कापूस केंद्रांत येत असल्याने केंद्र बंद करण्याची वेळ काही तालुक्यात
आली आहे.
जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी केंद्रांतील कापूस आणणाऱ्या वाहनांची गर्दीदेखील वाढत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक कापूस केंद्रांत येत असल्याने केंद्र बंद करण्याची वेळ काही तालुक्यात
आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर येथे केंद्र काही दिवसांसाठी बंद करावे लागले आहेत. कारण, आवक झालेल्या कापसावर प्रक्रिया करून गाठी सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर नव्याने कापूस खरेदी संबंधित केंद्रात सुरू होईल. चाळीसगाव येथील केंद्र सुमारे आठवडाभर सुरू होते. नंतर ते बंद झाले.
एकाच जिनिंग- प्रेसिंग कारखान्यात भार येवू नये, यासाठी कापूस महामंडळाने (सीसीआय) जळगाव, जामनेर, चोपडा येथे दोन ते तीन कारखाने खरेदीसाठी नियुक्त केले आहेत.
जळगाव तालुक्यात पाच कारखान्यांमध्ये खरेदी केली जाते. यात दोन कारखान्यांमध्ये रोज खरेदी केली जाते. तर, इतर तीन कारखान्यांमध्ये गरजेनुसार किंवा इतर दोन कारखान्यांमध्ये आवक वाढल्यानंतर खरेदी केली जाते. एकाच वेळी सर्व कारखान्यांत खरेदी केली जात नसल्याने जळगाव, जामनेर, चोपडा येथे खरेदी केंद्रात वाहनांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात मुक्काम करावा लागत आहे.
केंद्रांची संख्या वाढवा
खरेदी केंद्र आठवडाभर सुरू राहिल्यानंतर बंद केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. चाळीसगाव, पाचोरा येथेही खरेदी केंद्रांची किंवा कारखान्यांची संख्या वाढवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार येथेही सीसीआयच्या खरेदी केंद्रांत वाहनांची गर्दी वाढली आहे. गर्दी वाढत असल्याने पुन्हा एकदा नोंदणी पद्धत सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
- 1 of 657
- ››