Agriculture news in marathi Disruption of service of agricultural service centers in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांची सेवा विस्कळीत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

सकाळच्या सत्रात दुकाने सुरु ठेवतो आहोत. उपलब्ध खते-औषधे देत आहोत. शेतकऱ्यांची अडचण होऊ देत नाही. शिवाय दुकान बंद असले, तरी मागणीनुसार उघडून सेवा दिली जाते आहे. पण, सध्याचा साठा संपत आला आहे, तो पुन्हा आणायचा कसा, हा प्रश्न आहे. 
- रणजीत काटे, सदगुरु कृषी सेवा केंद्र, मार्डी, ता. उत्तर सोलापूर 
 
अत्यावश्यक सेवेत असल्याने कृषी सेवा केंद्रे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात ती उघडलीही जात आहेत. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, याची काळजी घेत आहोत. तरीही पुन्हा आढावा घेऊन सूचना देऊ. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर 
 

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॅाकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात कृषिसेवा केंद्रांचाही समावेश होतो. परंतु, ‘कोरोना’च्या भीतीने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची सेवा विस्कळीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पट्ट्यातील बहुतेक सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. 

जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असतो. अनेक भागात ज्वारी, गहू, हरभऱ्याची कापणी सध्या अंतिम टप्प्यात आहे, काही ठिकाणी ती पार पडली आहे. पिके ऐन बहारात असतानाच कोरोना आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः द्राक्ष, कलिंगड, खरबूज यासारखी फळे, भाज्या आणि कांदा यासारखी पिके सध्या शेतात आहेत. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने विविध नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यातून कसेबसे बाहेर येतो न येतो तोच कोरोनाने गाठले आहे. 

काही शेतकरी धडपड करून ही फळे, भाज्या विक्रीसाठी नेत आहेत. पण, सर्वांनाच ते जमत नसल्याने अडचण झाली आहे. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना खते आणि औषधांची गरज आहे. पण, कृषी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

जिल्ह्यात जवळपास २५०० हून अधिक कृषी सेवा केंद्रे आहेत. पण, त्यांपैकी अगदी बोटावर मोजण्याइतपत आणि तीही गावातील दुकाने सुरु आहेत. शहरातील एकही दुकान उघडे नाही. ‘कोरोना’च्या भीतीने विक्रेत्यांनी स्वतःहूनच ही दुकाने बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. शासनाने कृषी सेवा केंद्रांना अत्यावश्यक सेवेत घातल्याने दुकाने उघडण्याचे आवाहन केले आहे. पण, दुकानदार स्वतःहूनच बंद ठेऊन काळजी घेत आहेत. किमान लॅाकडाऊन काळापर्यंत तरी दुकाने उघडली जाणार नाहीत, असे सांगण्यात आले. 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...