जायकवाडीतून ३५ हजार ६३२ क्युसेकने विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, गंगापूर, इगतपुरी, कोंडूल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे ५४ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला. त्यामुळे जायकवाडीचे १६ दरवाजे उघडून ३५,६३२ क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू केला. - राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता जायकवाडी
जायकवाडीतून ३५ हजार ६३२ क्युसेकने विसर्ग
जायकवाडीतून ३५ हजार ६३२ क्युसेकने विसर्ग

जायकवाडी, जि. औरंगाबाद : नांदूर मध्यमेश्वरमधून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता आधीच तुडुंब असलेल्या जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याला जागा करण्यासाठी गोदावरीच्या पात्रात गुरुवारी (ता. २६) सकाळपासून १६ दरवाजे २ फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

येथील जायकवाडी धरणात नाशिक, नगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेने जवळपास ५३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सुरवातीला १० व नंतर गुरुवारी सकाळी १६ दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले.

दुपारी २ वाजता ३५६३२ क्युसेकने १६ दरवाज्यातून, तर उजव्या कालव्यातून ९०० क्युसेकने, डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकने, वीज केंद्रातून १५८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

बुधवारी (ता. २५) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली. त्यामुळे आधीच शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणाच्या पातळीने शंभर टक्के पातळी ओलांडली. त्यामुळे धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी त्यातून पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय घेतला. रात्री साडेनऊ वाजता दहा दरवाजे एक फूट सहा इंचाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com