agriculture news in marathi, distress in Chandrapur Congress | Agrowon

चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर लोकसभेबाबतची अनिश्‍चितता विनायक बांगडे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून दूर झाली. असे असतानाच बांगडे यांच्या उमेदवारीने कॉँग्रेस पक्षात मात्र धुसफूस वाढत अनेकजण राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. खुद्द प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्‍त केली. 

चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर लोकसभेबाबतची अनिश्‍चितता विनायक बांगडे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून दूर झाली. असे असतानाच बांगडे यांच्या उमेदवारीने कॉँग्रेस पक्षात मात्र धुसफूस वाढत अनेकजण राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. खुद्द प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्‍त केली. 

कॉँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभेसाठी सुरवातीला विशाल मुत्तेमवार यांचे नाव समोर आले. पार्सल उमदेवार म्हणून त्यांच्या नावाला जिल्ह्यातील नेतृत्वाकडून विरोध झाला. परिणामी त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यानंतर पुन्हा उमेदवारांच्या नावाची चचार्स सुरू झाली. भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेच आमदार बाळू धानोरकर यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे धानोरकर हे कॉँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्यांना कॉँग्रेसच्या तिकिटाची हमी दिली होती. पक्ष प्रवेशासाठी त्यांना दिल्लीला बोलविण्यात आले. शुक्रवारी (ता. २२) धानोरकर दिल्लीत पोचले. त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्‍वास मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होता. मात्र कॉँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत विनायक बांगडे यांचे नाव होते. तेव्हा साऱ्यांनाच धक्‍का बसला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्या वेळी त्यांनी कॉँग्रेस महासचिव मुकुल वासनिक यांच्याकडे बोट दाखविले.

याबाबत आपल्याला विश्‍वासात घेण्यात आले नाही, अशी खंत व्यक्‍त करतानाच आपणच राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे अशोक चव्हाण यांनी फोनवरून बोलताना सांगितले. त्यांचे हे टेलिफोनिक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर कॉँग्रेसकडून उमेदवारीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाल्याने बाळू धानोरकर आता अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. कॉँग्रेसच्या गोटातदेखील यामुळे अस्वस्थता असून, धानोरकरांना तिकीट न दिल्यास राजीनामे देण्याचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...