रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य वितरण करा ः जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन 

भंडारा ः लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत शासनातर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ज्या पात्र व्यक्‍तींकडे रेशनकार्ड नाही, अशा कुटुंबांना तत्काळ रेशनकार्ड देऊन धान्य वितरित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.
Distribute foodgrains to those who do not have ration cards: Collector Pradip Chandran

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, रेशनकार्ड नसणाऱ्या जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना तत्काळ धान्यांचा पुरवठा करण्यासाठी सर्व तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. 

गरज भासल्यास रेशनकार्ड वितरित करण्यासाठी मोहीम राबवावी. दिव्यांग व्यक्‍तींकडे पैसे नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू ते घेऊ शकत नाहीत. त्यांना किराणा कीट देण्यात यावी. निवारातील व्यक्‍तींना कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. किराणा असोसिएशनची बैठक घेऊन त्याबाबत आढावा घ्या. 

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आवश्‍यक सर्व बाबींसाठी नियुक्‍ती प्राधिकारी पासेस देणार असून उपविभागीय अधिकारी व महसूल अधिकारी यांनी अंतर्गत बाबीसाठी पासेस निर्गमित करावे. पासेससाठी ऑनलाइन अर्ज अपलोड करा किंवा पोलिसांशी संपर्क साधा. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकरी अभिषेक नामदास यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांविषयी सादरीकरण केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com