परभणीत शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गंत अनुदान वितरित

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (हवामानुकुल शेती प्रकल्प : पोकरा) अंतर्गंत आजवर जिल्ह्यातील ५५८ शेतकऱ्यांनी ८२६ हेक्टरवर विविध फळपीकांची लागवड केली आहे. त्यापैकी ३२३ लाभार्थींना १ कोटी ८५ लाख १३ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
परभणीत शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गंत अनुदान वितरित
परभणीत शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गंत अनुदान वितरित

परभणी  : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (हवामानुकुल शेती प्रकल्प : पोकरा) अंतर्गंत आजवर जिल्ह्यातील ५५८ शेतकऱ्यांनी ८२६ हेक्टरवर विविध  फळपीकांची लागवड केली आहे. त्यापैकी ३२३ लाभार्थींना १ कोटी ८५ लाख १३ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. दरम्यान, पोकरा अंतर्गंत विविध  घटकांसाठी ५ हजार ४७१ लाभार्थींना वितरित केलेल्या अनुदानावर १५ कोटी ८४ लाख ६ हजार रुपये निधी खर्च झाला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   पोकरा अंतर्गंत तीन टप्प्यांत मिळून जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायती अंतर्गंतच्या २७५ गावे समाविष्ट आहेत. त्यात परभणी तालुक्यातील ४८ गावे, जिंतूर मधील ५४ गावे, सेलू तील ३० गावे, मानवत मधील २२ गावे, पाथरी मधील २५ गावे, सोनपेठ मधील १४ गावे, गंगाखेड तालुक्यातील ३४ गावे, पालम मधील २४ गावे, पूर्णा  तालुक्यातील २४ गावे आहेत. आजवर जिल्ह्यातील  ४० हजार ७० शेतकऱ्यांनी विविध घटकांसाठी एकूण १ लाख ९ हजार ७८७ अर्ज केले आहेत.त्यापैकी ग्रामपंचायत स्तरावर १७ हजार ९४ अर्ज प्रलंबित आहेत. स्थळ पाहणी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या १८ हजार ६०२ तर पूर्वसंमतीसाठी प्रलंबित अर्जांची संख्या १ हजार ८१३ एवढी आहे. शेतकरी स्तरावर ९ हजार २७३ तर मोका तपासणी स्तरावर १ हजार ३२९ अर्ज प्रलंबित आहेत. टप्पा ५ आणि टप्पा ६ स्तरावर ४६३ अर्ज प्रलंबित आहेत. एकूण ५ हजार ४८८ लाभार्थींना अनुदान वितरित करण्यात आले  आहे. अनुदान वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये फळबागासाठी ३२३ लाभार्थींना १ कोटी ८५ लाख १३ हजार रुपये अनुदान  वितरित करण्यात आले आहे. शेततळ्यांसाठी ७९ लाभार्थींना २ कोटी ७६ लाख ७३ हजार रुपये, शेततळे  अस्तरीकरणासाठी ३ लाभार्थांना २ लाख ५७ लाख रुपये, विहिरींसाठी ४ लाभार्थींना ७ लाख ७३ हजार रुपये, ठिबक संचासाठी  ४३१ लाभार्थींना२ कोटी ७१ लाख ९८ हजार रुपये, तुषार संचासाठी १ हजार ६९ लाभार्थींना १ कटी ८३ लाख रुपये, विद्युत पंपासाठी ७५५ लाभार्थांना १ कोटी १ लाख ४८ हजार रुपये, पाईप लाईन साठी १ हजार ४१३ लाभार्थींना २ कोटी ७५ लाख १४ हजार रुपये, बिजोत्पादनासाठी १ हजार २२७ लाभार्थांना १ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपये, शेडनेट  हाऊससाठी १५ लाभार्थींना १ कोटी ४१ लाख रुपये, पॉलीहाऊससाठी २ लाभार्थींना २० लाख १८ रुपये, नाडेप वर्मी कंपोस्टसाठी २ लाभार्थींना १५ हजार रुपये, लागवड साहित्यासाठी १ लाभार्थींना १ लाख ४५ हजार रुपये,रेशीम शेती उद्योगासाठी ५ लाभार्थींना ४ लाख ९६ हजार रुपये, शेळी पालनासाठी ९ लाभार्थींना ४ लाख ८ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. शेतकरी शेतीशाळा अंतर्गंत १३३ लाभार्थांवर ३ लाख ८० हजार रुपये खर्च झाला आहे.

पोकरा अंतर्गंत फळपिक लागवड स्थिती        

फळपिक लाभार्थी संख्या क्षेत्र हेक्टर
सिताफळ   १०२  १५७
पेरु   १६०  २५७
कागदी लिंबू १३२   १७४
आंबा    ५५    ७७
संत्रा  ७२  ११४
मोसंबी  ३५ ४४
डाळिंब    २  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com