नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा मदतनिधी वितरित
हिंगोली ः ‘‘गतवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची दुसऱ्या टप्प्यातील ११४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपये मदतनिधी प्राप्त झाला आहे.
हिंगोली ः ‘‘गतवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची दुसऱ्या टप्प्यातील ११४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपये मदतनिधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात मिळून एकूण २२९ कोटी ९६ लाख २४ हजार रुपये निधी प्राप्त झाला. शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यासाठी तो तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
गतवर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ९६ हजार १७९ हेक्टरवर पेरणी झाली होती. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी, तर काही मंडळांमध्ये ढगफुटी झाली. स्थानिक परिसरातील ओढे, नाले तसेच कयाधू नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले.
सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुराचे पाणी शिरून नदीकाठच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. अतिवृष्टीमुळे एकूण ३ लाख ६ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले.
सोयाबीनचे २ लाख ४४९ हेक्टर, कपाशीचे २१ हजार ४३२ हेक्टर, ज्वारी १ हजार ८७८ हेक्टर, मूग १ हजार ४१४ हेक्टर, उडीद १ हजार ५२० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. बागायती क्षेत्रातील पिकांमध्ये ८७६ शेतकऱ्यांच्या २२५ हेक्टरवरील हळदीचे, २०७ शेतकऱ्यांच्या १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. एकूण ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांच्या २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले.
शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ११४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपये निधी प्राप्त झाला. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.
दुसऱ्या टप्प्यात राज्य आपत्ती निवारण बलाच्या निष्कर्षानुसार प्रचलित तसेच वाढीव दराने अनुक्रमे ७८ कोटी १९ लाख ६६ हजार रुपये आणि ३६ कोटी ७८ लाख ४६ हजार रुपये असा एकूण ११४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपये निधी प्राप्त झाला.
- 1 of 1028
- ››