परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के पीककर्ज वाटप

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात पीककर्जाचे वाटप संथगतीने सुरू आहे. सोमवार (ता. ११) पर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी २० हजार ३९७ शेतकऱ्यांना १०८ कोटी ७२ लाख रुपये (२४.०६ टक्के) कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे.
Distribution of 24.06 per cent peak loan in Parbhani district
Distribution of 24.06 per cent peak loan in Parbhani district

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात पीककर्जाचे वाटप संथगतीने सुरू आहे. सोमवार (ता. ११) पर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी २० हजार ३९७ शेतकऱ्यांना १०८ कोटी ७२ लाख रुपये (२४.०६ टक्के) कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना अजूनही हात मोकळा सोडला नाही. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.

बॅंकांना यंदाच्या रब्बी हंगामात ४५१ कोटी ८७ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना २५८ कोटी ३४ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३४ कोटी ८३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ४७ कोटी ४८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १११ कोटी २२ लाख रुपये उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांना सर्वाधिक पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले तरी त्यांची पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ असून आजवर ३ हजार ८०५ शेतकऱ्यांना २७ कोटी ७७ लाख रुपये कर्जवाटप केले. त्यात भारतीय स्टेट बॅंकेने १ हजार ५१० शेतकऱ्यांना ११ कोटी ३२ लाख रुपये (८.३६ टक्के), बॅंक ऑफ बडोदाने ४ शेतकऱ्यांना ६ लाख रुपये, बॅंक ऑफ इंडियाने १५९ शेतकऱ्यांना १ कोटी २३ लाख रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्राने ४१० शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, कॅनरा बॅंकेने ७८८ शेतकऱ्यांना ४ कोटी ८४ लाख रुपये, युनियन बँकेने ३९४ शेतकऱ्यांना ३ कोटी २४ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने ४ शेतकऱ्यांना ३ लाख रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेने ५० शेतकऱ्यांना ४० लाख रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेने १७५ शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख रुपये, युको बॅंकेने ३११ शेतकऱ्यांना २ कोटी ५२ लाख रुपये कर्ज वाटप केले. इंडियन बॅंकेने सोमवारपर्यंत कर्जवाटप केले नव्हते. चार खासगी बॅंकांपैकी एचडीएफसी बॅंकेने एका शेतकऱ्यास ७ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बॅंकेने ३७२ शेतकऱ्यांना ५ कोटी ८१ लाख रुपये, आयडीबीआयने ४८६ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये कर्ज वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com