वाशीम जिल्ह्यात ४६ टक्के पीककर्जाचे वाटप

जिल्ह्यात या हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणासाठी १६०० कोटींचे उद्दिष्ट बॅंकांना दिल्या गेले होते. यापैकी बॅंकांनी ७४१ कोटी ७७ लाख रुपये वितरित केले. लक्ष्यांकाच्या तुलनेत ही कामगिरी केवळ ४६.३६ टक्के एवढीच आहे.
Distribution of 46% crop loan in Washim district
Distribution of 46% crop loan in Washim district

वाशीम ः जिल्ह्यात या हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणासाठी १६०० कोटींचे उद्दिष्ट बॅंकांना दिल्या गेले होते. यापैकी बॅंकांनी ७४१ कोटी ७७ लाख रुपये वितरित केले. लक्ष्यांकाच्या तुलनेत ही कामगिरी केवळ ४६.३६ टक्के एवढीच आहे. मात्र, दुसरीकडे पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी एक लाख दोन हजार शेतकऱ्यांना पीककर्ज देत बँका ९१.०७ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यशस्वीसुद्धा झाल्यात.

या हंगामासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील १६०० कोटी रुपये खरिपात पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक निर्धारीत केला होता. मात्र, पात्र असलेले शेतकरी विविध कारणांनी पीककर्ज मिळवण्यापासून वंचित राहिले. यामुळे १६०० कोटींच्या तुलनेत ७४१ कोटी ७७ लाख रुपयेच वितरित होऊ शकले. यामध्ये प्रामुख्याने कर्जमुक्त झालेल्या ५९९१४ शेतकऱ्यांना ३७० कोटींचे पीककर्ज मिळाले. ८४३१ नवीन शेतकऱ्यांना ६२ कोटी ३१ लाख तर ३४५९६ जुन्या शेतकऱ्यांना नव्याने ३०९ कोटी रुपयांचे पीककर्ज मिळाले.

पीककर्ज वाटपासाठी नेमून दिलेली ५० टक्केही रक्कम वितरित झाली नाही. परंतु शेतकरी संख्येचा विचार केल्यास पात्र असलेल्यांपैकी ९१.०७ टक्के म्हणजेच १ लाख २९४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात बँका यशस्वी राहिल्या. रकमेचा विचार करता नियोजित अर्धी रक्कमही वितरित झालेली नाही. यामागे तांत्रिक अडचणी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांना कर्जमाफी वेळेवर न मिळणे, कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकणे, खातेदार थकीत असणे, अशा कारणांमुळे अडचणी तयार झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com