नगर जिल्ह्यात ४६ हजार टन अन्नधान्याचे वाटप

नगर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून दि. १ ते ५ एप्रिल या पाच दिवसांत जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार २३ एवढ्या शिधापत्रिका धारकांना तब्बल ४६ हजार १३४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागातून ही माहिती देण्यात आली. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
Distribution of 46 thousand tonnes of food in the city district

नगर जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ३० लाख १३ हजार ८८२ आहे. या लाभार्थ्यांना १ हजार ८८४ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड २६ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड ०९ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो. 

जिल्ह्यात या योजनेमधून दि. ५ एप्रिल अखेर सुमारे २९ हजार १९५ क्विंटल गहू, १६ हजार ९३९ क्विंटल तांदूळ तर २२२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या शिधापत्रिका धारकांना ते जेथे राहत आहे त्याठिकाणी पोर्टेबिलीटीद्वारे धान्य वितरण करण्याच्या सूचना तहसीलदार यांना देण्यात आलेल्या आहेत. कालअखेर २ हजार ५९९ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेअंतर्गत लाभ घेतला आहे.

जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास कारवाई नगर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र, सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग व पोलिस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com