पेठ येथे कृषी मंत्र्यांच्याहस्ते कृषी निविष्ठांचे वाटप

बुलडाणा ः अकोला येथील विभागीय खरीप आढावा बैठक आटोपून औरंगाबादकडे जात असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते बुधवारी (ता. २७) चिखली तालुक्यातील पेठ येथे कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
Distribution of agricultural inputs by the Minister of Agriculture at Peth

पेठ येथील पैनगंगा शेतकरी गटामार्फत खरेदी केलेल्या बांधावर खत वाटप योजनेअंतर्गत खताचे श्री. भुसे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. खत वाटप करतेवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी बांधावर खत वाटप योजनेचा लाभ घ्यावा. जेणेकरून गटामार्फत खत घेतल्यास पैशांची बचत सुद्धा होईल. रास्त दरामध्ये शेतकऱ्यांना खत मिळेल, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, बुलडाणा उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विकास अधिकारी अनिषा महाबळे, उपसंचालक श्री. बेतीवार, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक व गटाचे प्रमुख विष्णू शेळके आणि इतर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com