बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप

बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. परंतु, आजही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना नियोजित रकमेच्या केवळ ७ टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे.
Distribution of crop loan in Buldana only 7%
Distribution of crop loan in Buldana only 7%

बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. परंतु, आजही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांना नियोजित रकमेच्या केवळ ७ टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे. 

जिल्ह्यात २४६० कोटींचे लक्ष्यांक आहे. मात्र, अवघे १७३ कोटी रुपये बँकांनी आजवर वितरीत केले. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने संपूर्ण वर्ष अडचणीत गेले आहे. आगामी पेरणीसाठी पीककर्जाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. जिल्हयाचे पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी आजवर दोन आढावा बैठका घेत बँकांनी पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याचे निर्देश दिले.

बैठकांमध्ये अधिकारी होकार देत असले तरी प्रत्यक्षात मात्र नकार देत आहेत. हंगामासाठी ३ लाख ६२ हजार खातेदारांना पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक ठेवण्यात आलेला आहे. आतापर्यंत २२ हजार ६१० शेतकऱ्यांना पीककर्ज मिळू शकले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती सक्षम नसल्याने पीक कर्जवाटपाचा भार हा सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी बँकांवर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २४६० पैकी १६७० कोटी रुपयांचे वितरण करायचे आहे. ३० मे पर्यंत या बँकांनी अवघे ८४ कोटी ५४ लाख रुपये वाटप केले. म्हणजेच केवळ पाच टक्के रक्कम वाटप केली. या बँकांना २ लाख ८२ हजारावर शेतककऱ्यांना पीककर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आले आहे. बँकांनी आजवर ११ हजार ३८९ शेतकऱ्यांना कर्ज दिले. हे प्रमाण अवघे चार टक्के खातेदार एवढी संख्या आहे. 

खासगी बँकांना ३३४ कोटींचा लक्ष्यांक असून आतापर्यंत १९.७९ कोटी वाटप केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला ३८९ कोटींचा लक्ष्यांक दिलेला असून या बँकेने ३७.७६ कोटी रुपये ३७५७ शेतकऱ्यांना दिले. तर, जिल्हा बँकेला मिळालेल्या ६५ कोटींच्या लक्ष्यांकापैकी ३० कोटी रुपये ६६३४ खातेदार शेतकऱ्यांना वितरीत केले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com